लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील अडीच वर्षे फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक

Ad 1

शिरुर गावचे हद्दीतील एका मुलीशी यातील आरोपी भाऊ खोमणे याने वारंवार जबरदस्ती करत तिच्यावर अत्याचार केला होता त्याबाबत शिरुर पोलीस स्टेशनमध्ये ( दि.19 ) रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी भाऊ उर्फ दगडू सुरेश खोमणे,(वय 27 वर्षे, रा राहू ता दौंड, जि पुणे ) हा अडीच वर्षे पर्यंत फरार होता.

हा आरोपी ( दि.07) रोजी राहू गाव परिसरात येणार असल्याची माहिती स्था. गु. अ. शाखेच्या तपास पथकाला मिळाली होती. त्याअनुषंगाने त्यानी सापळा रचून त्यास ताब्यात घेतले आहे.

सदर आरोपीची वैदकीय तपासणी करून शिरुर पो स्टे चे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कामगिरी ही पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट ,सहा फौजदार दत्तात्रय गिरमकर,पोना मंगेश थिगळे,पोना जनार्दन शेळके,पोना अजित भुजबळ,पोना राजू मोमीन यांनी केली