शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उरुळी कांचन येथे व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून दिला प्रतिसाद

अमोल भोसले,उरुळी कांचन

शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनी कंपन्यांना भाड्याने देऊन भविष्यात त्या जमिनींचे मालक कंपन्यांना करण्याचा कट या शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये केंद्र सरकारने केलेला आहे तो तातडीने रद्द करावा अशी मागणी उरुळी कांचन येथे रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवी प्रकाश देशमुख यांनी केली.

दिल्लीमध्ये चाललेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला उरुळी कांचन येथे व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार बंद ठेवून आज कडकडीत बंद पाळून, केंद्र सरकारचा जाहीर निषेध करुन व शेतकरी हिताच्या विरुद्ध केलेले तिन्ही कायदे रद्द करण्याची मागणी करत पूर्ण पाठिंबा देण्यात आला यावेळी देशमुख बोलत होते. आज सकाळी ११ वाजता उरुळी कांचन येथून जाणाऱ्या पुणे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शेतकरी प्रतिनिधी तसेच महाविकासआघाडी मधील सहभागी पक्षाचे कार्यकर्ते व रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवी प्रकाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीमध्ये चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता पण कोरोना महामारीचा काळ असताना व जमाव बंदी आदेश असताना आपण रस्ता रोको आंदोलन करु नये अशा लोणी काळभोर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या विनंतीला मान देऊन या सर्वांनी रस्ता रोको न करता जमलेल्या सर्व मंडळींनी रस्त्याच्या बाजूला उभे राहून दिल्लीतील शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी एक सभा घेतली व त्यामध्ये केंद्र सरकारच्या दडपशाही करुन शेतकऱ्यांची गळचेपी करणाऱ्या तीन कायद्यांचा निषेध करीत हे कायदे रद्द करण्याची मागणी केली.

यावेळी हवेलीतील जेष्ठ नेते के.डी. कांचन, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक राजाराम कांचन, रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवी प्रकाश देशमुख, पुणे जिल्हाध्यक्ष रामदास कोतवाल, उपाध्यक्ष सुशिल शिंदे, तालुकाध्यक्ष अनिल कोतवाल, देविदास भोरडे, सुभाष टिकोळे, संदीप शिवले, नितिन इंगळे, संदिपान भोरडे, माजी पंचायत समिती सदस्य काळूराम मेमाणे, माजी सरपंच दत्तात्रय शां. कांचन, तंटामुक्ती अध्यक्ष अमित कांचन, माजी उपसरपंच सागर कांचन, भाऊसाहेेेब कांंचन, रा. काँ. शहराध्यक्ष कांतीलाल काळे, माजी उपसरपंच रामभाऊ तुपे, माजी सदस्य संतोष कांचन, शिवसेनेचे राजेंद्र बोरकर, प्रसाद कांचन, यांच्यासह अनेक मान्यवर व रयत शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. पोलीस निरीक्षक सूरज बंडगर व उरुळी कांचन पोलिस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी यावेळी चौक बंदोबस्त ठेवला होता.

Previous articleघोडेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत पुन्हा घेण्याची मागणी
Next articleलैंगिक अत्याचार गुन्ह्यातील अडीच वर्षे फरार असलेला आरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक