भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत महत्वाचा वाटा- महेश वाघमारे

Ad 1

सिताराम काळे,घोडेगाव

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही तितकेच प्रेरक आणि प्रभावी आहेत. भारतीय संविधान निर्मितीत महत्वाचा त्यांचा वाटा आहे. समता, बंधुता, लोकशाही, स्वातंत्र, जागतिक अर्थकारण तसेच राजकारण या विषयी मांडलेले त्यांचे विचार आजही समर्पक ठरत असल्याचे मत पंचशील उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष महेश वाघमारे यांनी व्यक्त केले.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भारतीय बौध्द महासभा, भीमजयंती महोत्सव, वंचित बहुजन आघाडी, पंचशिल उत्कर्ष मंडळ घोडेगाव, विश्व हिंदु परिषद बजरंग दल घोडेगाव प्रखंड, राष्ट्रीय स्वयंसंघ घोडेगाव व ग्रामस्थ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. तसेच सकाळी ९ वा. सामुदायिक वंदना करून कार्यक्रमास सुरूवात केली. मागील विस वर्षांपासुन घोडेेगाव शहरामधून कॅंन्डलमार्च काढण्यात येत आहे. त्याप्रमाणे याही वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व शासकीय नियमांचे पालन करत कॅंन्डलमार्च काढण्यात येणार असल्याचे महेश वाघमारे यांनी सांगितले.