नायफड पंचायत समिती गण” या व्हाँटसअँप ग्रुपची अपघात ग्रस्त तरूणाला औषधोपचारासाठी पंचवीस हजारांची आर्थिक मदत

बाबाजी पवळे, राजगुरूनगर-सध्या तरुण पिढीपासून प्रत्येकाकडे स्मार्टफोनचा असला, तरी त्या स्मार्टफोनच्या वापरातून स्मार्टवर्क होण्याचे प्रमाण कमीच आहे. त्यातही व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमाचा वापरही केवळ विरंगुळा आणि चॅटिंगसाठीच अधिक होताना दिसतो. मात्र याच व्हॉट्सअँपद्वारे सतत एकमेकांच्या संपर्कात असलेल्या नायफड  पंचायत समिती गण या ग्रुपवरील सदस्य एकत्र येत अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत.

खेड तालुक्यातील “नायफड पंचायत समिती गण” या व्हॉट्सअॅप ग्रुपने असंच एक कौतुकास्पद काम केलं आहे.अपघात ग्रस्त तरूणाला औषधोपचारासाठी आर्थिक मदत मिळवून देण्याचं काम या व्हॉट्सअॅप ग्रुपने केलं आहे

तीन महिन्यापुर्वी गुंडाळवाडी येथे लाईटचे पोलचे टँक्टरमधून खाली उतरवत असताना दिपक लांघी (रा.खरोशी) या तरूणांच्या पायावर पडल्याने गुडघ्याच्या खाली मध्यभागी पाय मोडला होता . यावेळी ठेकेदाराने खर्च देतो पण खर्च दिला नाही. किरकोळ खर्च केला होता.पण आँपरेशनचा खर्च मात्र दिला नाही यामुळे नायफड वाशेरे ग्रुपवर शरद जठार,सुनिल मिलखे, नंदकुमार गोपाळे यांनी सोशल मिडीयावर मदतीचे आवाहन केले होते याला ग्रुपमधील सदस्यांनी पाचशे,हजार दोन हजार अशी पंचवीस हजार रोख रक्कम व मनोहर पोखरकर यांनी आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून किराणा माल देऊन मदत केली.

दिपक लांघी या तरूणाला औषधोपचारासाठी महिन्याला तीन हजार च्या आसपास खर्च येत असून पाच ते सहा महिने औषधोपचाराचा खर्च असून दानशूर व्यक्तींनां मदतीचे आवाहन आवाज जनतेचा न्यूज पोर्टलच्या वतीने करण्यात येत आहे.

मदतीसाठी नाव – दिपक काळू लांघी
बँक- बँक आँफ महाराष्ट्र हडपसर
Account no- 60205638160
IFSC Code – MAHB0000081
मो.नंबर – 9763571732

Previous articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत महत्वाचा वाटा- महेश वाघमारे
Next articleकोविडची लस देताना पत्रकारांचा प्राधान्याने विचार करण्याची मराठी पत्रकार परिषदेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी