राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी कांचन ढमालेची निवड

बाबाजी पवळे,राजगुरुनगर -राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी कांचन ढमाले यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिलं. कांचन ढमाले पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

ढमाले यांनी विविध सामाजिक कार्यातून आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख आहे.त्यांनी आजपर्यंत सामाजिक व राजकीय क्रार्यक्रमात विविध प्रकारे मदतीचा हात दिला आहे त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातील नागरिकांतून अभिनंदन होत आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून येणाऱ्या काळात सर्वसामान्यांसाठी काम करणार असल्याचे ढमाले यांनी सांगितले

Previous articleउरुळी कांचन येथे त्रिपुरी पोर्णिमे निमित्त ग्राम दैवत श्री भैरवनाथ मंदिर व श्री कृष्ण मंदिरात भव्य दिपदान कार्यक्रम संपन्न
Next articleभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भारतीय संविधान निर्मितीत महत्वाचा वाटा- महेश वाघमारे