उरुळी कांचन येथे त्रिपुरी पोर्णिमे निमित्त ग्राम दैवत श्री भैरवनाथ मंदिर व श्री कृष्ण मंदिरात भव्य दिपदान कार्यक्रम संपन्न

अमोल भोसले,उरुळी कांचन

त्रिपुरी पोर्णिमेनिमित्त उरुळी कांचन (ता.हवेली) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर व श्रीकृष्ण मंदिरात भव्य दिपदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात परिसरातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेऊन मंदिरात काढलेल्या भव्य रांगोळी भोवती एक हजार अकरा पणत्या पेटवून दिपादानाचा वार्षिक अन महत्वाचा दिवाळी नंतरचा देव दिवाळीचा उत्सव अत्यंत मनोभावे संपन्न करीत आनंद साजरा केला. गेल्या ६ वर्षांपासून श्रीकृष्ण सेवा मंडळ उरुळी कांचन यांच्या वतीने हा सामूहिक दिपादानाचा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. याला परिसरातील महिलावर्गाचा अत्यंत चांगला प्रतिसाद मिळतो.

मयूर मोरे या रांगोळी कलाकाराने गालिचा प्रकारची अत्यंत सुबक अशी रांगोळी दोन्ही मंदिरात रेखाटली होती त्याच्या भोवती दिवे पेटवल्यानंतर हे दृश्य आणखी नयनरम्य दिसत होते. ग्रामदैवत श्रीभैरवनाथ मंदिरात हा कार्यक्रम यंदा पहिल्यांदाच संपन्न करण्यात आला.

दोन्ही मंदिरातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दत्तात्रय बाजीराव कांचन, शरद वनारसे, सुनील जगताप, संतोष चौधरी, सुनील तांबे, संपत चव्हाण, आबा चव्हाण, प्रसाद कांचन, संजय क्षीरसागर, ओंकार क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी योगदान दिले. यावेळी महादेव कांचन, राजाराम कांचन, रामचंद्र धोंडीबा कांचन, नंदकिशोर बगाडे, राजेंद्र कांचन, भाऊसाहेब कांचन, लक्ष्मण जगताप आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleमेमाणे फार्मची संकल्पना राज्यसरकारने पुढाकार घेऊन राज्यभर राबवावी …विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
Next articleराष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा महिला उपाध्यक्षपदी कांचन ढमालेची निवड