मेमाणे फार्मची संकल्पना राज्यसरकारने पुढाकार घेऊन राज्यभर राबवावी …विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

अमोल भोसले,उरुळी कांचन

येथील किशोर मेमाणे यांनी अतिशय कमी जागेत आदर्शवत असा शेतीपूरक व्यवसाय उभारुन शेतकऱ्यांना सहज मोठे आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी संकल्पना राबवल्याचे पाहून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी समाधान व्यक्त करुन शेतकऱ्यांनी स्वबळावर उभे राहण्यासाठी व कमी जागेत जास्त उत्पन्न घेण्याची संकल्पना मेमाणे परिवाराने राबवली आहे ते मॉडेल म्हणून राज्यसरकारने राज्यामध्ये पुढाकार घेऊन राबविले पाहिजे असे मेमाणे फार्मची पहाणी करुन व मेमाणे फार्मचे संस्थापक किशोर मेमाणे यांच्याशी चर्चा केल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले पत्रकारांशी बोलताना सांगितले.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष राजकुमार पाटील, महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक राजु ओसवाल, पुणे कॅन्टोन्मेंट माजी अध्यक्ष शांताराम चौधरी, मेमाणे फार्मचे संस्थापक किशोर मेमाणे, पुणे जिल्हा पत्रकार संघाचे समन्वयक सुनिल जगताप, पुरंदर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष राजेंद्र शिंदे, शाश्वत विकास फौंडेशनचे अध्यक्ष प्रभाकर जगताप, एलाईट उद्योग समूहाचे व्यवस्थापक दिलीप गाडेकर, प्रताप कांचन, सामाजिक कार्यकर्ते विकास रेवडकर यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.

लोकशाहीमध्ये प्रत्येकाचे मत कुठे जातेय हे समजून घेण्याचा अधिकार मतदात्याला आहे. नुकतेच झालेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीच्या माध्यमातून बॅलेटद्वारे झालेले मतदान योग्य आहे हे पुन्हा सिद्ध झाले. आता लोकच मागणी करत आहेत ही ईव्हीम बंद करुन बॅलेटवर मतदान घ्या. त्यामुळे लोकांचा कल पाहून केंद्र सरकारने विशेष लक्ष घालून निवडणूक पद्धतीत निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.

Previous articleबारामतीत रंगलीय त्या फोटोंची चर्चा…
Next articleउरुळी कांचन येथे त्रिपुरी पोर्णिमे निमित्त ग्राम दैवत श्री भैरवनाथ मंदिर व श्री कृष्ण मंदिरात भव्य दिपदान कार्यक्रम संपन्न