Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
सिताराम काळे, घोडेगाव
स्ट्रॉबेरी हे पीक महाबळेश्वरच्या थंड हवामानात पदवीधारक युवकाने काळया मातीत स्ट्रॉबेरी पीक घेऊन आंबेगाव तालुक्यातील शेतकर्यांपुढे गावडेवाडी येथील अक्षय बाबाजी टेमकर या कृषी पदवीधारक युवकाने काळया मातीत स्ट्रॉबेरी पीक घेऊन एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे.
आदर्शगाव गावडेवाडी माजी उपसरपंच बाबाजी टेमकर हे नेहमीच आपल्या शेतीत विविध प्रयोग करत असतात,त्यांचा मुलगा अक्षय हा कृषी विभागाची पदवी संपादन करून नोकरीच्या मागे न लागता शेतातच काम करून नवनवीन पिके घेण्याकडे लक्ष देऊ लागला आहे,असतात मात्र त्याला अक्षय हा अपवाद ठरला आहे, आता त्यांना शेतात मदत करू लागला आहे.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात स्ट्रॉबेरी ला प्रतिकूल हवामान नसतानादेखील त्यांनी 11 गुंठे क्षेत्रात 600 स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करून त्याची निगा राखून आज त्यांना उत्पादन चालू झाले आहे आत्तापर्यंत यासाठी 60 ते 70 हजार रुपये खर्च आला असूनदिवसा आड स्ट्रॉबेरीचा तोडा चालू झाला आहे, अक्षय टेमकर याने वडील बाबाजी टेमकर व आई सविता टेमकर यांच्या मदतीने यशस्वीपणे स्ट्रॉबेरीची लागवड करून सोशल मीडियातील इंस्टाग्राम च्या साह्याने @shetkariraja या नावाने अकाऊंट होऊन आत्तापर्यंत त्याने घेतलेल्या पिकाची माहिती व छायाचित्रे अपलोड केल्यामुळे त्याला स्थानिक बाजारपेठ व मॉल मधून मोठ्याप्रमाणावर मागणी होत आहे, चालू वर्षी महाबळेश्वर परिसरात स्ट्रॉबेरीची लागवड अतिवृष्टीमुळे कमी झाल्यामुळे अक्षयने लावलेल्या स्ट्रॉबेरीला साडेतीनशे ते अडीचशे रुपये बाजार भाव मिळत आहे, नुकतेच चालू झालेल्या स्ट्रॉबेरी पिकाचे अजून तीन ते चार महिने उत्पादन सुरू राहणार असल्याचे अक्ष यांनी सांगितले,तीन ते चार महिन्यात तीन ते साडेतीन टन उत्पादन घेऊन उत्पादन खर्च वजा जाता दोन ते अडीच लाख रुपये मिळेल असा अंदाज अक्षय टेमकर याने व्यक्त केला आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.