वाढदिवसानिमित्त आपल्या भावाबाबत एका बहिणीने लिहिलेल्या भावना

अमोल भोसले,उरुळी कांचन

सुदर्शन जगदाळे हे नाव आता गगनाला भिडले आहे. खूप खूप खूप आनंद होत आहे सुदर्शन जगदाळे अशी एक वेगळी छाप पडली आहे तुझ्या बरोबर तू आई आणि दादांची एक वेगळी ओळख घडवली. त्यांचा आनंद तर काही वेगळाच असेल, व्यक्त करता येणार नाही. लहानपणी किती वेंधळा होतास.खूप मारायचा, केस ओढायचा. अरे जयाताईला तर तिचं लग्नझाल्यानंतरही तू रडवल होतं. पण त्या आठवणी आता छान वाटतात.पण १२वी ला तुझा बदललेला स्वभाव पाहून नवलच वाटले तिथून पुढे खूप सिन्सियेर झालास. नंतर तू नांदेडला गेला. त्यावेळेस खरं सांगू मला खूप आनंद झाला कारण तूझ्या वाट्याचे प्रेम आणि खाण्याचे पदार्थ आता माझे होणार पण तू नांदेडवरुन आलास की मी आनंदी व्हायचे कारण तू तिकडून येताना माझ्यासाठी मोठ्या भावासारखा काहीतरी घेऊन येशील.पण तू मला कधीच काही आणले नाही. राग यायचा पण मी समजून घ्यायची.पण त्यावेळेस सुध्दा मी इतरांना अभिमानाने सांगत की माझा भाऊ नांदेडला शिकत आहे. खूप छान चाललं होतं पण तो दिवस ८ फेब्रुवारी२००७ विसरता येत नाही पण म्हणतात ना काही चांगलं होण्यासाठी काही वाईट होत. त्यातूनही मार्ग निघत गेले. आईं, दादा आणि तू हिम्मत हारली नाही.

पण मी तुझ्या अपघातानंतर कधीच उभारुन आले नाही. तू म्हणतोस तोंड पडून बसते, तोंडावर तीनतेरा वाजलेले असतात पण एकामागून एक प्रसंग असे आले की त्यामुळे तो माझा स्वभाव झाला.आता सगळं चांगलं आहे पण त्या आठवणी मनात टोचतात.दादा नेहमी म्हणायचे माझ्या दिपाला मी काहीच कमी पडू देणार नाही.पण कमी पडले ते आपल्या माणसांची जवळीक, ज्या वेळी खरंच आपल्या माणसांची गरज होती तेव्हा ती मिळाली नाही. तुझ्या अपघातानंतर ते माझ्या लग्नापर्यंत तुम्ही तिघेही माझ्या बरोबर, माझ्या सोबत असूनही नसल्यासारखे होतात. त्यावेळी वाटलं तुझा अपघात झाला नसता तर..हे मी बोलते पण मी हे जसं जसं बोलत आहे तसं तसं माझं मन हलकं होत आहे.

लग्नही झालं लग्न झाल्यावर थोडा आनंद झाला. पण लग्न झाल्यावर खूप संकटांना तोंड द्यावे लागले. तेव्हा वाटले तुझा अपघात झाला नसता तर लग्नानंतरचा पहिला दिवाळ सण, भाऊबीज मी तुला खूप मिस केलं, खूप रडले का? ते तू समजला असशील. त्यावेळी पुन्हा वाटलं तुझा अपघात झाला नसता तर… आईं, दादा ,तू इतर सगळ्यांची खूप कमतरता जाणवली. समजू शकते मी लांब आहे. सर्वात जास्त आई आणि दादांची आठवण कधी आली माहिती आहे का ? तेव्हा जेव्हा मी पहिल्यांदा कौमुदी ला पाळणाघरात ठेवले. तेव्हा मी तुला फोन करुन खूप रडत होते, आणि तेव्हा आईपासून मूल दूर होण्याची वेदना कळाली. आईचही तुझ्याबद्दल असच झालं. नंतर थोडे दिवस चांगले गेले पण जेव्हा आपली तनू आपल्याला सोडून गेली मला तेव्हापासून आपली माणसं माझ्यापासून दूर होत आहे असचं वाटू लागलं आणि मी अजून उदास होत गेले.परी झाल्यावर त्यातूनही सावरले पण तनुची आठवण नेहमीच येते.
असं नाही की दिलीपजी चांगले नाही किंवा त्यांच्याकडून काही कमी पडत आहे. त्यांच्याकडून मी खूप काही शिकले.आता सर्व काही सुरळीत होत आहे. पण तुमच्या सर्वांची खूप आठवण येत असते. कारण माझ्या मुलींना ज्या वेळी आजी आणि आजोबांची गरज होती त्यांच्या प्रेमाची गरज होती तेव्हा त्यांना पाळणाघरात राहावे लागले. मी आणि माझ्या मुलींनी खूप काही मिस केले किंवा ते आमच्या नशिबात नव्हते. कदाचित यामुळे माझा स्वभाव असा झाला.पण यात एक गोष्ट आहे तू मात्र प्रत्येक वेळी संकटात,आनंदात फोन करायचा, आधार वाटायचा.तू आता मोठा झाला म्हणजे लोक तुला आदराणे, कौतुकाने पाहत आहे. सर्वांसाठी तू एक प्रेरणदायी बनला आहे. तुझ्या वाढदीवसानिमित्त जेव्हा मोठमोठी माणसे आली तेव्हा माझ्या मनात तुझ्याबद्दल एक वेगळी छाप पडली. आता हा एक सामान्य व्यक्ती राहिला नाही असे वाटू लागले.आता आई आणि दादांची सर्व स्वप्न पूर्ण होतील.त्यातील एक स्वप्न जे आम्हा बहिणींचे पण आहे ते म्हणजे तू चालण्याचे. तुझ्यामुळे आम्हाला खूप अभिमान होतंय.. कालचीच गोष्ट तू बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रिया सुळे यांना भेटला ते फोटो मी स्टेटस वर ठेवले आणि तेव्हापासून आत्तापर्यंत मला माझ्या वाढदवसानिमित्त जेवढ्या शुभेच्छा येत नाही तेवढ्या तुझ्यासाठी आल्या. यात दुसरा आनंद नाही.

शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार अन्य पक्षसंघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी विशेष लक्ष देतात आणि काळजी घेतात हे आठवणीने सांगावे लागेल. तू आता कामात बिझी होतो आहे पण…..यात तू मला फोन करण्याचं कमी केलं आहे असं वाटतं कृपया असं करु नको. आई आणि दादांबरोबर तू सुद्धा माझा मोठा आधार आहे. तुझ्या एक फोनने खूप छान वाटत.
आता बदलेल मी मला तुझा आदर्श घेऊन.मला माहित नाही मी भावनेच्या भरात काय लिहिले ते….हे लिहिताना डोळ्यात पाणी आले मला तुला हे का सांगावे वाटले माहित नाही. पण तू समजून घेशील ना… उद्या माझा वाढदिवस आहे.तू हे वाचशील आणि मला समजून घेशील ही माझी वाढदिवसाची भेट समजेल. उद्याचा दिवस माझ्यासाठी वेगळा असेल.

Previous articleवेश्या व्यवसाय चालवणाऱ्या विश्वनाथ लॉजवर नारायणगाव पोलिसांची कारवाई ;तीन जणांना अटक
Next articleपदवीधर युवकाने काळया मातीत स्ट्रॉबेरी पीक घेऊन शेतकर्‍यांपुढे ठेवला आदर्श