स्कार्पिओतून गावठी हातभट्टी दारूची वाहतूक ; तब्बल ११९० लिटर गावठी हातभट्टी दारु जप्त

लोणी काळभोर (सुचिता भोसले) : लोणी काळभोर पोलिसांनी केली गावठी दारु वाहतुक करणाऱ्यावर कारवाई केली असून यात एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून तब्बल ११९० लिटर गावठी तयार हातभट्टी दारु जप्त केली असून एक स्कार्पिओ गाडीसह चार लाख एकोण साठ हजार पाचशे माल हस्तगत केला.गोविंद सखाराम गायकवाड (वय २४ रा. भाटघगरनगर ,पिंपरी चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक पांढऱ्या रंगाची स्कार्पिओ शिंदवणे वरुन थेऊर मार्गी पिंपरी चिंचवड येथे तयार दारु विक्रीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी थेऊर येथे सापळा पांढऱ्या रंगाची गाडी पकडली असता थेऊर फाटा ते थेऊर रस्त्यावर थेऊर गावच्या हद्दीतील चौकात

आरोपी गोविंद हा पांढऱ्या रंगाची महिद्रा कंपनीची स्कार्पिओ (नंबर एम एच १४ ए ई १२९४) गाडीमध्ये ३५ लिटर मापाची एकुण ३४ नग प्ये ११९४ लिटर गावठी हातभट्टीची तयार दारूची वाहतुक करीत असताना ताब्यात घेतले.त्याच्याकडून एकुण ३५ लिटरचे ३४ कॅन मधील ११९४ लिटर गावठी दारु त्याची अंदाजे किंमत रु ५९ हजार पाचशे रुपये व स्कार्पिओ अंदाजे किंमत चार लाख असा एकुण चार लाख एकोण साठ हजार पाचशे रुपये इतका मुद्देमाल हस्तगत केला आहे.

Previous articleछत्रपती युवा सेना संघटनेत सामाजिक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश
Next articleपोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा वाढदिवस अविश्री बालसदन मध्ये साजरा