छत्रपती युवा सेना संघटनेत सामाजिक कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

सुचिता भोसले,पुणे-छत्रपती फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ कदम याचे पुणे जिल्हा पदाधिकारी च्या वतीने हार्दिक स्वागत करण्यात आले .मराठी क्रांती मोर्चा ची बैठक संपन्न झाल्यानंतर छत्रपती फाउंडेशन ची बैठक आयोजित करण्यात आली.

यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ कदम सर्व कार्यकर्त्याना युवकांना उद्योग व्यवसाय क्षेत्रात उतरावं. मराठी माणूस आपला संघटनेचा कार्यकर्ता सामाजिक कार्याबरोबर व्यवसायात पुढे जाव आपलं कर्तृत्व सिद्ध करावं स्वतःच्या पायावर एक उद्योजक म्हणून उभं राहावं जगासमोर एक आदर्श निर्माण करावं .सध्या देशात कोरोना संकटाच्या काळात बेरोजगार संख्या खूप वाढत आहे या अनुषंगाने बैठकीच्या वेळी संस्थापक अध्यक्ष गणेश कदम बोलत होते.

छत्रपती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ कदम यांच्या मार्गदर्शना खाली प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर राजे भोसले,राज्य समन्वयक पुष्पा ताई जगताप, यांच्या आदेशानुसार नियुक्ती करण्यात आले. कोथरूड विभाग अध्यक्ष गणेश संकपाळ, शिवाजीनगर विभाग अध्यक्ष सचिन भोसले ,हवेली तालुका महिला अध्यक्ष मनीषा कुंभार, या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी संस्थापक अध्यक्ष गणेश भाऊ कदम , प्रदेश सरचिटणीस ज्ञानेश्वर राजे भोसले, कु पुष्पकताई  केवाडकर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष,महाराष्ट्र दारूबंदी प्रदेश अध्यक्ष राजभाऊ भोसले,नाशिक महानगरप्रमुख यश बच्छाव, गोकुळ वाईकर,छत्रपती युवा सेना शहर प्रमुख अमोल धडके, हवेली तालुका प्रमुख आदेश इंगळे, रक्षक फाउंडेशन प्रदेश अध्यक्ष सचिन भोसले,आदी सर्व कार्यकते पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संस्थापक अध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्त्यास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleक्रांतीसुर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुण्यतिथी इंदापूर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन
Next articleस्कार्पिओतून गावठी हातभट्टी दारूची वाहतूक ; तब्बल ११९० लिटर गावठी हातभट्टी दारु जप्त