पोलीस निरीक्षक नारायण पवार यांचा वाढदिवस अविश्री बालसदन मध्ये साजरा

दिनेश पवार,दौंड

दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आपला ४७ वा वाढदिवस कुरकुंभ येथील अविश्री बालसदन येथील मुलांसोबत साजरा केला.

यावेळी पोलीस निरीक्षक नारायण पवार म्हणाले की मी ज्या पोलीस स्टेशन ला जातो तेथील अनाथआश्रम मध्ये जावून वाढदिवस साजरा करतो
ज्यांनी नाही कोणी त्यांना आम्ही हे तत्व मनी बाळगून आपल्या आनंदाचे क्षण या मुलांसोबत साजरा करून एक समाधान मिळते त्यामुळे असा वाढदिवस मी साजरा करतो.अविश्री बालसदन हे 1996 पासून कुरकुंभ येथे सुरू आहे,समाजातील सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अनेक व्यक्तीं यास मदत करत आहे, दौंड मधील पहिलेच पोलीस निरीक्षक आहेत जे स्वतः बालसदन मध्ये येऊन त्यांनी असा वाढदिवस साजरा केला आहे असे अनिल कटारिया यांनी सांगितले.

यावेळी पत्रकार बांधव,बालसदन मधील मदतनीस,मुले यांच्या उपस्थितीत हा वाढदिवस साजरा करण्यात आला,यानिमित्ताने उपस्थित सर्वांना पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या तर्फे सस्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

Previous articleस्कार्पिओतून गावठी हातभट्टी दारूची वाहतूक ; तब्बल ११९० लिटर गावठी हातभट्टी दारु जप्त
Next articleचाकणमध्ये ड्राय डे च्या दिवशी दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पोलीसांची कारवाई