लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमांत ५० पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्यास कारवाई करण्याचा आंबेगाव पोलीसांचा इशारा

सिताराम काळे, घोडेगाव

– पुणे ग्रामीण जिल्हयात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असुन रूग्णांची संख्या वाढत आहे. लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमांमध्ये ५० पेक्षा जास्त लोकांनी सहभागी होऊ नये, अन्यथा जास्त येणा-या लोकांवर कायदेशिर कारवाई पोलीस अधिक्षक यांच्या आदेशानुसार करण्यात येणार असल्याचे मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे व घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

पुणे ग्रामीण पोलीसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, लग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमात ५० पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये. हॉटेल व्यावसायिक व मंगल कार्यालय व्यावसायिकांनी सदरचे आदेशान्वये दिलेल्या सुचना व अटींचे पालन करावे. लग्न व इतर समारंभासाठी येणा-या लोकांची यादी संबंधित व्यावसायिकांनी स्वतःकडे ठेवावी. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावेत. बेकायदा जमाव, कायदयाचे उल्लंघन करून नये. अन्यथा आदेशाचे पालन न करणा-यांवर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांनी सांगितले.

Previous articleअखेर चाकण – तळेगाव रस्त्याला मुहूर्त “२४ कि.मी ” चे होणार काँक्रीटीकरण…आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश
Next articleक्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले पतसंस्था व ग्रामपंचायत घोडेगाव यांच्या वतीने अभिवादन