क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले पतसंस्था व ग्रामपंचायत घोडेगाव यांच्या वतीने अभिवादन

सिताराम काळे, घोडेगाव

– अखंड भारतात स्त्रीशिक्षणाचे जनक, थोर समाज सुधारक व जातीभेदाविरोधात बंड पेटविणारे क्रांतिसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था, ग्रामपंचायत घोडेगाव व विविध संघटनांच्यावतीने अभिवादन करण्यात आले.

दलीत, शोषित, पीडितांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महात्मा फुले यांनी जीवनभर लढा दिला. सावित्रीबाईंच्या सोबतीने त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. आंबेगाव तालुक्यात ठिकठिकाणी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याची आठवण करीत त्यांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती सखाराम घोडेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालय ज्ञानेश्वर घोडेकर, किरण घोडेकर, गणेश भास्कर, माजी ग्रामपंचायत उपसरपंच व विदयमान सदस्य सुनिल इंदोरे, स्वप्निल घोडेकर, अक्षय नंदकर, गणेश वाघमारे, गणेश घोडेकर, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, मोहन कोळपकर, अनिल घोडेकर, सचिन काळे, तिळवण तेली समाज अध्यक्ष रविंद्र कर्पे, एकनाथ गोसावी, दिपक घोडेकर, पुष्कर रत्नपारखी आदि उपस्थित होते.

Previous articleलग्न समारंभ व घरगुती कार्यक्रमांत ५० पेक्षा जास्त लोक सहभागी झाल्यास कारवाई करण्याचा आंबेगाव पोलीसांचा इशारा
Next articleदौंडमध्ये “संविधान गौरव दिन” उत्साहात साजरा