आण्णासाहेब मगर बँकेची लावलेली चौकशी निरंक.. बँक प्रगतिपथावर ……

भोसरी – आण्णासाहेब मगर सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष नंदकुमार लांडे यांचे विरुध्द तक्रारदारांनी केलेल्या तक्रारीस अनुसरुन झालेल्या चौकशीद्वारे मा. अप्पर आयुक्त (प्रशासन ), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी त्यांना अपात्र घोषित केले होते. या संदर्भात माजी अध्यक्ष नंदकुमार लांडे यांनी माननीय सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांचेकडे दाखल केलेल्या स्थगिती प्रस्तावास मंजुर मिळाल्याने नंदकुमार लांडे हे पुन्हा निवडणुक लढविण्यास पात्र झाले आहेत, तसेच बँकेची फिरते पथकामार्फत झालेल्या चौकशीसंदर्भातील दाखल केलेल्या स्थगिती मा. सहकार मंत्री महोदयांनी मंजुरी दिलेली आहे. त्यानिमीत्त बँकेच्या संचालक मंडळाच्या वतीने नंदकुमार लांडे यांचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला.

यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रा. राजेश सस्ते, उपाध्यक्ष मनोज बोरसे, संचालक अॅड, घनशाम खलाटे, सुलोचना भोवरे, गणेश पवळे, दिपक डोळस तज्ञ संचालक सीए अमेय दर्वे व मुख्य कार्यकारी अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

बँकेच्या विकासाची गती बेगाने चालू असताना बँकच्या काही सभासदांनी वैयक्तीक आकरसापोरटी बँकेच्या विरुध्द मोठे षडयंत्र रचले व सातत्याने त्यांनी बँकेच्या सभासद, ठेवीदार, खातेदार यांचेमध्ये सोशल मिडीयाचा वापर करुन संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला, सहकार स्त्रात्याकडे त्यांनी केलेल्या अनेक तक्रारीच्या अनुषंगाने सहकार खात्यामार्फत बँकेची कायदा कलम ८१ अन्बये चाचणी लेखापरिक्षण झाले तसेच कायदा कलम ८३ अन्वये चौकशी झाली. या सर्व चौकशीमध्ये बँकेस कोणत्याही प्रकारची आर्थिक तोशिष लागली नसल्याचे सर्व तपासणी अधिकारी यांनी त्यांचे तपासणी अहवालामध्ये नमुद केले आहे. तक्रारदार सातत्याने करत असलेल्या संभ्रमाचे वातारणामुळे बँकेच्या एकूणच आर्थिक स्थितीवर त्याचा विपरीत परिणाम होत गेला.

परंतु अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य तसेच अधिकारी व सेवकांनी संभ्रमीत झालेल्या सभासदांना, ठेवीदारांना व खातेदारांना बँकेविषयीची विश्वासार्हता वाढवुन बँकेचे आर्थिक व्यवहार वाढवणेसाठी शास्वत केले. आज रोजी बैक पुन्हापूर्वपदावर येऊन प्रगतीच्या व सक्षमतेच्या दृष्टीने वाटचाल करत आहे. अशी माहिती बँकेचे अंध्यक्ष प्रा. राजेश सस्ते यांनी दिली.

Previous articleछत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान कडून दावडीच्या गायकवाड विद्यालयास कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप
Next articleसमाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने कांचन परिवाराच्या वतीने मिठाई वाटप