समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या हेतूने कांचन परिवाराच्या वतीने मिठाई वाटप

अमोल भोसले,उरुळी कांचन

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील ग्रामपंचायत प्रशासक – कर्मचारी वर्ग, महसूल विभागाचे अधिकारी – कर्मचारी वर्ग, प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी – आरोग्य सेवक, आशा वर्कस, पत्रकार बांधव, पोलीस विभाग यांनी कोरोनाच्या कठीण काळात अतिशय प्रभावीपणे काम केले. म्हणून आपण खरं सुरक्षित आहोत याची जाणीव ठेवून भविष्यात सर्वानी पुन्हा एकदा योग्य ती काळजी घ्यावी आणि प्रशासनाला योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या सविता कांचन यांनी व्यक्त केले.

उरुळी कांचन (ता.हवेली) येथील ग्रामविकास आधिकारी – ग्रामपंचायत कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आधिकारी- सर्व कर्मचारी, महसूल विभागाचे आधिकारी – सर्व कर्मचारी, पोलीस ठाण्यामधील आधिकारी – सर्व कर्मचारी, महावितरण मधील आधिकारी- सर्व कर्मचारी, यांना दिपावलीच्या निमित्ताने सामाजिक कार्यकर्त्या सविता कांचन यांच्या माध्यमातून मिठाई वाटप करण्यात आली.

कांचन परिवाराने स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला असल्याचे मत उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी यांनी सांगितले.

ग्रामापंचायत प्रशासक निकेतन धाकटे, ग्रामविकास अधीकारी डोळस यशवंत, तलाडी आँफीसचे रामलिंग भोसले,अशोक सोनवणे, प्राथमिक आरोग्य केंद्र डाँ सुचिता कदम, सर्व डाँकटर आँफीस स्टाप महावितरण उरुळी कांचन उपविभाग शाखा नंबर १ पोपळे व कर्मचारी वर्ग विकास जाधव उरुळी कांचन सबडिवीजन उपविभाग सर्व स्टाप इत्यादी
जयाताई चौधरी,सुरेखाताई जुनवणे, सुवर्णा बागडे, वैशाली बाबर,शौला मोरे, जया लोंढे,शारदा कांचन,नलिनी कांचन,रुपाली बांरगुळे, दिपाली दरेकर, राणी चौंडकर ,किरन पाटेकर ,सरला उरसळ , उत्तम कांचन रमेश कांचन,सचिन कांचन,सागर कांचन,सनी बागडे, आकाश शेंडगे,प्रथेमेश कोतवाल, विनोद आपुने ,सागर नवले आदी उपस्थित होते.

Previous articleआण्णासाहेब मगर बँकेची लावलेली चौकशी निरंक.. बँक प्रगतिपथावर ……
Next articleकार्तिकी एकादशीच्या निमित्ताने बालगंधर्वमध्ये अभंगवाणीचा भक्ती सोहळा संपन्न