छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान कडून दावडीच्या गायकवाड विद्यालयास कोरोना प्रतिबंधक साहित्याचे वाटप

राजगुरुनगर- कोरोना महामारीच्या साथीमुळे गेले आठ महिन्यापासून शैक्षणिक संस्था बंद आहेत. शासनाच्या निर्णयानुसार २३ नोव्हेंबर पासून इ.९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग चालू करण्यास परवानगी देणेत आलेली आहे. परंतू हे वर्ग पालकांनी संमती दिली तरच सुरू होणार आहे.पालकांनी संमती दिलेले जेवढे विद्यार्थी शाळेत येतील तेवढ्याच विद्यार्थ्यावर वर्ग चालू करणेत आलेले आहे.या विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सर्वतोपरी काळजी घेणे ही शैक्षणिक संस्थांची जबाबदारी आहे.

दावडीच्या श्रीमंत महाराजा फत्तेसिंहराव गायकवाड विद्यालय व ज्युनिअर कॉलेज साठी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान दावडी यांनी सामाजिक बांधिलकी जपून थर्मामीटर,ऑक्सीमीटर ,सॅनिटायझर,हॅन्डवाॅश आणि सोडीयम हैपोक्लोराईट इत्यादी कोरोना प्रतिबंधक साहित्य विद्यालयास दिले.

यावेळी छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान व स्कूल कमिटीचे सदस्य सुरेश डुंबरे, मोशन क्लिप्सचे डायरेक्टर व प्रतिष्ठानचे सदस्य बाबासाहेब दिघे,सचिन ऊढाणे, रौनक इंटरप्राईजेस चे डायरेक्टर राजेश कान्हुरकर, विद्यालयाचे प्राचार्य अंकुश केंगारे व इतर सर्व शिक्षक ,कर्मचारी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य यांनी प्रतिष्ठानचे कौतुक करून आभार मानले.

Previous articleकंपनीकडे खंडणी मागणाऱ्या माथाडी कामगार संघटनेच्या अध्यक्षासह ५ जणांच्या महाळुगे पोलीसांनी मुसक्या आवळल्या
Next articleआण्णासाहेब मगर बँकेची लावलेली चौकशी निरंक.. बँक प्रगतिपथावर ……