दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना शासकीय कार्यालयांत वाहिली श्रद्धांजली

सिताराम काळे, घोडेगाव

तहसिल कार्यालय, घोडेगाव पोलीस ठाणे, पंचायत समिती आंबेगाव व प्रशासकीय कार्यालय घोडेगाव तहसिलदार रमा जोशी, सहायक पोलीस निरीक्षक प्रदिप पवार यांचे उपस्थित संविधान प्रतिमा पूजन व संविधान प्रास्तविकाचे वाचन करण्यात आले. तसेच घोडेगाव पोलिस ठाण्यात मुंबईतल्या इतिहासात २६/११/२००८ च्या महाभयंकर अशा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.

भारतीय बौध्द महासभा, भीम जयंती महोत्सव संस्था आंबेगाव तालुका व पंचशील उत्कर्ष मंडळ घोडेगाव यांचे संयुक्त विदयमाने संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महेश वाघमारे, गणेश वाघमारे, नरेश कसबे, सुनिल अंकुश, संजय अंकुश, अनिल गायकवाड, पंकज सरोदे, तुषार लव्हांडे, सहादु लव्हांडे, रवि सोनवणे, महेंद्र अंकुश, सुनिल इंदारे, विकास मोरे, सोनु अभंग, रमेश घोडेकर, ग्रामसेवक संघटना आंबेगाव तालुका व ग्रामसेवक उपस्थित होते.

पंचायत समिती आंबेगाव मध्ये असणारे संविधान स्तंभ हा कार्यालय प्रमुख व त्या सहकारी कर्मचारी यांना आजच्या दिवसाचा विसर पडल्याचे दिसुन आले. पंचायत समिती कार्यालयामध्ये भरपूर कर्मचारी असताना देखिल स्तंभ परिसर हा स्वच्छ करू शकले नसल्याबाबतची नाराजी हयावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली

Previous articleभिमाशंकरला जाणाऱ्या भाविकांची खड्ड्यांनी केली हाडे खिळखिळी
Next articleबहिरवाडीत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल