बहिरवाडीत तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सात जणांवर गुन्हा दाखल

बाबाजी पवळे,राजगुरूनगर – खेड तालुक्यातील बहिरवाडी येथे तीन पत्ती जुगार खेळणाऱ्या सात जणांना खेड पोलिसांनी छापा टाकू ताब्यात घेण्यात आले. या कारावाईमध्ये खेळाचे साहित्य ,१ हजार ९१० रुपये जप्त करण्यात आले. मंगळवारी ( दि. २४) रोजी पोलिसांनी ही कारवाई केली.

बाजीराव विठ्ठल राक्षे (वय ४८), साहेबराव महादु शेडाणे (वय ४२), संतोष मारूती राक्षे (वय ४३), सुभाष ज्ञानेश्वर राक्षे (वय ३५), राघु बळवंत राक्षे (वय ५०), दत्तात्रय सावळेराम शेडाणे (वय ४०) व काळु मारूती राक्षे (वय ३८, सर्व रा. बहिरवाडी, ता.खेड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची जुगार खेळणाऱ्यांची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,बहिरवाडी गावात काही व्यक्ती तीन पत्ती जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या ठिकाणी पोलीसांनी छापा टाकून तीन पत्ती जुगार खेळत असताना सात जणांना रंगेहाथ पकडले. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई स्वप्निल लोहार यांनी फिर्याद दिली आहे. खेड स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास करण्यात येत आहे.

Previous articleदहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना शासकीय कार्यालयांत वाहिली श्रद्धांजली
Next articleबिबट्याने पाडला वासराचा फडशा