कडूस येथे गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरूणांना अटक ; सहा किलोचा गांजा जप्त

राजगुरुनगर : कडूस (ता.खेड) गावच्या हद्दीत गांज्याची विक्री करत असलेल्या दोन युवकांकडून ६ किलोचा गांजा खेड पोलिसांनी जप्त केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

विकास रोहिदास वधाले (वय २३, रा. नवलाख उंब्रे, बधालेवस्ती ता. मावळ), सोमनाथ लक्ष्मण मुसळे (वय ३६, रा. मुसळेवाडी कडुस, ता. खेड) अशी आरोपींची नावे आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,
सोमवरी (दि.२) रात्री कडुस येथील शिंदेवस्ती आणि कडुस गावामध्ये विकास वधाले याच्याकडे हे दोघे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून दोघांना रंगेहात पकडले. त्यांच्याकडे प्लास्टीकच्या बॅगमध्ये चार किलो वजनाचा चोवीस हजार रुपये किमतीचा गांजा पोलीसांना मिळून आला. तसेच सोमनाथ मुसळे यांनी विक्रीसाठी म्हशीच्या गोठ्यात लपवून ठेवलेला दहा हजार आठशे रुपायांचा गांजा पिशवीमध्ये आढळला. आरोपींकडील अँक्टिवा सह एकुण ६४ हजार आठशे रुपायांचा मुद्देमाल खेड पोलिसांनी जप्त करून दोघांना अटक केली आहे.पुढिल तपास खेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बडाख करत आहेत

Previous articleपरप्रांतीय ट्रॅक्टरवरील कर्णकर्कश साऊंडच्या आवाजाचा नागरिकांना त्रास
Next articleपंचायत समिती मार्फ़त सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या योजनांची माहिती मिळावी -पासलकर