पंचायत समिती मार्फ़त सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या योजनांची माहिती मिळावी -पासलकर

दिनेश पवार,दौंड

दौंड पंचायत समिती मार्फत सर्वसामान्य जनतेला मिळणाऱ्या योजनांची माहिती मुदतीच्या वेळेत, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य चे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबू पासलकर यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देवून विनंती केली आहे.

सर्वसामान्यजनतेला शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या योजनांची माहितीच लाभार्थ्यांपर्यँत पोहचत नसल्याने अनेक लाभार्थी या लाभापासून वंचीत राहत आहेत योजनेची मुदत संपून गेल्यावर उशिराने काही योजना माहिती होतात तर काही योजना माहितीच होत नाही त्यामुळे अनेक लाभार्थी वंचीत राहत आहेत तरी यावर योग्य ती उपाययोजना करून माहिती सर्वसामान्य जनतेला पोहचवण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती या निवेदनात माहिती अधिकार कार्यकर्ता समिती महाराष्ट्र राज्य च्या वतीने करण्यात आली आहे,.

यावेळी पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाबू पासलकर, सामाजिक कार्यकर्ते गणेश बाबासो म्हस्के,मारुती पासलकर, अजिंक्य ढवळे उपस्थित होते

Previous articleकडूस येथे गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरूणांना अटक ; सहा किलोचा गांजा जप्त
Next articleआहुपे खोर्‍यात भात काढणीची कामे अंतिम टप्प्यात