परप्रांतीय ट्रॅक्टरवरील कर्णकर्कश साऊंडच्या आवाजाचा नागरिकांना त्रास

राजगुरुनगर : शेतीकामाच्या नावाखाली बाहेरच्या तालुक्यांतून आलेल्या अनेक ट्रॅक्टर चालकांनी वेगवेगळ्या गावांमध्ये आपले बस्तान बसवले असून रस्त्यावरुन जाता येताना मोठमोठ्या व कर्णकर्कश आवाजात गाणी वाजवत रस्त्यावरील सुरक्षितता धोक्यात आणली आहे.

कोरोना काळात विद्यार्थ्यांना घरच्या घरी ऑनलाइन व ऑफलाईन अभ्यास करावा लागत असून या ट्रॅक्टर वरील गाण्यांमुळे विद्यार्थ्यांना,आजारी व्यक्तीना व वयोवृदधांना देखील नाहकच त्रास होत आहे.पोलिस
प्रशासनाने गावोगावच्या पोलिस पाटील व ग्राम पंचायतींच्या माध्यमातून अशा ट्रॅक्टर चालकांचा शोध घेऊन अशांवर ध्वनिप्रदुषण कायद्यानुसार कारवाई करावी व ट्रॅक्टरवरील साऊंड सिस्टीम जप्त करून ताब्यात घ्याव्यात अशी जनतेची मागणी आहे.

Previous articleकाठापुर गावच्या हद्दीत अवैध दारूची विक्री करणार्‍या हॉटेलवर मंचर पोलिसांनी केली कारवाई
Next articleकडूस येथे गांजाची विक्री करणाऱ्या दोन तरूणांना अटक ; सहा किलोचा गांजा जप्त