काठापुर गावच्या हद्दीत अवैध दारूची विक्री करणार्‍या हॉटेलवर मंचर पोलिसांनी केली कारवाई

Ad 1

प्रमोद दांगट, निरगुडसर

मंचर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या काठापुर (ता.आंबेगाव) गावच्या हद्दीत पारगाव/ शिरूर रोडवर असलेल्या हॉटेल चारंगबाबा येथे अवैध रित्या देशी दारूची विक्री करणार्‍यावर मंचर पोलिसांनी कारवाई केली असून दारूविक्री करणाऱ्याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सोमवार दि, २३ /११/२०२० रोजी पो.ना.खैरे यांना बातमीदारा मार्फत पारगाव / शिरूर रस्त्यावरील हॉटेल चारंगबाबा हॉटेल येथे अवैध दारूविक्री करत असल्याची माहिती मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी पंच व पोलीस स्टाफ घेऊन घटनास्थळावर गेले त्या वेळी हॉटेलच्या काऊंटरवर प्रकाश मधुकर काळे ( वय ३४ ,सध्या राहणार पारगाव ता.आंबेगाव जि.पुणे / मूळ राहणार हिंगोली ता.औंढा नागनाथ ) हा देशी दारुची विक्री करत होता.पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळील १,३०० रुपयांचा देशी दारूचा माल ताब्यात घेतला आहे. याबाबत मंचर पोलीस ठाण्याचे पो.कॉ.वाय.पी.रोडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस नाईक निलेश खैरे करत आहे.

Previous articleचांडोली परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद
Next articleपरप्रांतीय ट्रॅक्टरवरील कर्णकर्कश साऊंडच्या आवाजाचा नागरिकांना त्रास