चांडोली परिसरात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद

 प्रमोद दांगट, निरगुडसर

चांडोली बु (ता. आंबेगाव) येथे व परिसरात धुमाकूळ घालणा-या बिबट्याला मंगळवार (दि 24) रोजी जेरबंद करण्यात यश आले आहे. काही दिवसांपूर्वी वेताळमळा येणे मोटारसायकल स्वारावर हल्ला करून बिबट्याने त्याला जखमी केले होते. बिबट्या जेरबंद झाल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

वेताळमळा येथील जयदीप थोरात आणि ओंकार थोरात हे मोटारसायकलावर जात असताना बिबट्याने रात्रीच्या वेळी हल्ला केला होता. तसेच अनेकदा दिवसाही बिबट्याचे दर्शन नागरिकाना होत होते. बिबट्याने परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, मेंढ्या, कुत्र्यावर हल्ला करत त्याना ठार केले होते. त्यामुळे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर सोमवार (दि. 23 ) रोजी जयसिंग थोरात यांच्या शेतात पिंजरा लावुन त्यात सावज ठेवण्यात आले होते. त्यानंतर बिबट्या शिकारीच्या शोधत आला असता पिंजऱ्यात कैद झाला आहे.

Previous articleशाळेची घंटा वाजली आठ महिन्यांनी “कभी खुशी ‘ कभी गम”
Next articleकाठापुर गावच्या हद्दीत अवैध दारूची विक्री करणार्‍या हॉटेलवर मंचर पोलिसांनी केली कारवाई