औद्योगिक नगरीत अवैध धंदा करणाऱ्यांचे धाबे दणाणले

चाकण- महाळुंगे पोलीस चौकी मध्ये नव्याने बदली होऊन आलेले पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी अवैध धंद्यांवर छापे मारून कारवाई केली आहे. त्यामुळे औद्योगिक नगरीतील अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत

अवैध गावठी दारू धंद्यांवर महाळुंगे पोलिसांनी मोठी कारवाई केली. त्यामध्ये तब्बल डर्म मध्ये साठवलेले ३०० लिटर कच्च्या दारूचे रसायन नष्ट केले आहे. तसेच देशी-विदेशी दारू विक्री करणाऱ्या व्यवसायावर छापा टाकून द्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.
औद्योगिक भागातील अवैध धंद्यांचे उच्चाटन करण्यासाठी सुरू असलेल्या कारवाई अंतर्गत महाळुंगे पोलिसांनी निघोजे आणि मोई गावातील अवैध मद्य व्यवसाय अड्डय़ांवर छापे टाकून कारवाई केली. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे हजारो रुपयांचा किंमतीचे हातभट्टी मद्यसाठा रसायन नष्ट करण्यात आले. मद्याची अवैध वाहतूक-विक्री करणारे, अवैध धंदे चालविणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहेत असे महाळुंगे पोलिसांनी सांगितले आहे.

महाळुंगे चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राठोड, पोलीस नाईक अमोल बोराटे, पोलीस कॉन्स्टेबल मिसाळ, पोलीस नाईक वाजे, पोलीस कॉन्स्टेबल माटे यांनीही ही कारवाई केली आहे. महाळुंगे पोलीस पुढील तपास करीत आहेत.यावेळी सापडलेले अवैध दारूचे रसायन नष्ट केले आहे.

Previous articleमहाराजा ग्रुपच्या वतीने संपर्क बालग्रामध्ये‌ दिवाळी फराळ वाटप
Next articleमहात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रावसाहेब पवार तसेच स्वागताध्यक्षपदी सुनील धीवार