महाराजा ग्रुपच्या वतीने संपर्क बालग्रामध्ये‌ दिवाळी फराळ वाटप

Ad 1

चाकण- खेड तालुक्यातील महाळुंगे येथील महाराजा ग्रुपच्या वतीने भरत शिवळे यांच्या स्मरणार्थ व दिवाळीचे औचित्य साधून संपर्क बालग्राम,शेलपिंपळगाव येथील अनाथ बांधवांच्या समवेत दिवाळी फराळ वाटप करून व दिवाळी उपयोगी वस्तू व पणत्या वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली.

  दिवाळीचे फराळ, पणत्या , पुस्तक संच, कपडे, फटाके अशा विविध वस्तु अनाथ बांधवाना वाटप करून हा उपक्रम सम्पन्न झाला.

      महाराजा ग्रुपचे तथा सामाजिक कार्यकर्ते सचिन शिवळे पाटील यांच्या अनमोल सहकार्यातुन हा उपक्रम पूर्णत्वास गेला.

आपली दिवाळी वंचित घटकांसोबत करून महाराजा ग्रुपने केलेल्या या सामाजिक कार्यक्रमांचे कौतुक होत तर आहेच, मात्र गरजूंच्या चेहऱ्यावर सुखाचे भाव उमटल्याचे पाहणे हाच आमचा दिवाळीचा आनंद असल्याचे सचिन शिवळे पाटील यांनी सांगितले.

 या वेळी सामाजिक कार्यकर्ते विनोद शिवळे,आकाश शिवळे, अभिषेक शिवळे, दिनेश भोसले,शुभम शिवळे, आदि मान्यवर उपस्थित होते.