महात्मा फुले साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी रावसाहेब पवार तसेच स्वागताध्यक्षपदी सुनील धीवार

Ad 1

अमोल भोसले ,उरुळी कांचन

महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत रावसाहेब पवार यांची तर स्वागताध्यक्षपदी बहुजन हक्क परिषदेचे अध्यक्ष सुनील धीवार यांची निवड करण्यात आली आहे अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.

संमेलनाच्या संयोजन समितीच्या बैठकीत निवड करण्यात आली .यावेळी संमेलनाच्या संयोजन समितीचे सदस्य विजय तुपे, राजाभाऊ जगताप, श्यामराव मेमाणे, गंगाराम जाधव, दत्ता भोंगळे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवासे, दत्ता कड आदी उपस्थित होते.

खानवडी (ता. पुरंदर) येथे दि. २८ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाचे हे तेरावे वर्षे आहे . यापूर्वी संमेलनाध्यक्ष पद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, प्रा गंगाधर बन बरे, रतनलाल सोना ग्रा, श्रीमंत कोकाटे, डॉ जयप्रकाश घुमटकर, जब्बार पटेल, दशरथ यादव, शरद गोरे, म भा.चव्हाण आदींनी भूषविले आहे.
श्री पवार हे समाजवादी चळवळीत गेली 40वर्षे काम करीत आहेत. साहित्य परिषद सासवड येथे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन चे निमंत्रक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सामाजिक कार्यात नेहमी त्यांचा सहभाग असतो. धरणग्रस्त चळवळी त्यांनी उभी करुन आंदोलने केली आहेत.

सुनील धिवर यांनी बहुजन हक्क परिषदेच्या माध्यमातून, लोकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. साहित्य चळवळीत गेली 1५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग असतो.