दारूविक्री करणाऱ्या टोळीवर वालचंदनगर पोलिसांकडून मोठी कारवाई! तीन महिन्यासाठी केले तडीपार…

इंदापूर -तालुक्यातील काझड गावामध्ये गेल्या चार वर्षांपासून एक कुटूंब अवैध दारू विक्री करून गावात सामाजिक वातावरण बिघडवण्याचे काम करत होते. वालचंदनगर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत संपूर्ण कुटुंबच तडीपार केली आहे. त्यांना तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे.

ललिता कांतीलाल भारती या महिला कुटुंब प्रमुखासह कांतीलाल बाळू भारती, प्रदीप कांतीलाल भारती, संदीप कांतीलाल भारती, सोनल संदीप भरती हे सर्व अवैध दारू विक्री आणि महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा विक्री करून परिसरात दहशत निर्माण करत होते. तसेच कोणी या कुटुंबाला हे अवैध धंदे करण्यास विरोध केला तर त्याला मारहाण करून दहशत निर्माण करत होते. याबाबत यापूर्वीही या कुटुंबावर अनेक गंभीर गुन्हे वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेले आहेत.

यामुळे अनेक सामान्य लोकांचे संसार उध्वस्त झाले होते. यावर गावातील महिलांनी अनेकवेळा आवाज उठवून गावात दारूबंदी साठी आवाज उठवला होता. वालचंदनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यामार्फत ही कारवाई केली. आरोपींना तीन महिन्यांसाठी इंदापूर, बारामती, दौंड आणि पुरंदर या तालुक्यांमधून हद्दपार केले आहे.

ग्रामपंचायत सदस्य महेंद्र खताळ तसेच गावातील सचिन नरुटे,मनोज पाटील, प्रशांत नरुटे या तरुणांसह मनीषा नरुटे, उज्वला नरुटे, माया नरुटे, रेखा चव्हाण, मंदा चव्हाण, सोनाली जाधव, रुपाली नरुटे, या महिलांनी सतत पाठपुरावा करून गावातील दारूबंदीसाठी प्रयत्न केले होते .

Previous articleखळबळजनक -सापाला मारून जाळल्याने तिघांवर गुन्हा दाखल
Next articleमहाराजा ग्रुपच्या वतीने संपर्क बालग्रामध्ये‌ दिवाळी फराळ वाटप