महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कंटेन्मेंट झोन असलेल्या लक्ष्मीनगर वसाहत परिसरात प्रत्यक्ष पाहणी करुन उपाययोजनांचे केले नियोजन

अतुल पवळे पुणे

प्रतिबंधित क्षेत्रातील कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी कोथरूड येथील लक्ष्मीनगर वसाहत कोथरूड येथे प्रत्यक्ष पाहणी केली.

पाहणीदरम्यान नगरसेवक पृथ्वीराज सुतार, नगरसेविका हर्षालीताई माथवड, वासंतीताई जाधव, आरोग्य प्रमुख डॉ रामचंद्र हंकारे, उपायुक्त नितीन उदास, उपआयुक्त (झोनिपु) अविनाश सकपाळ, सहायक आयुक्त संदीप कदम, विभागीय आरोग्य निरीक्षक राम सोनवणे, वैद्यकीय अधिकारी सौ. टिळेकर, पोलिस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड, पोलिस निरीक्षक कल्पना जाधव, इतर अधिकारी, पोलिस व कर्मचारी उपस्थित होते.सदर पाहणी दरम्यान खालील प्रमाणे सूचना केल्या.खाजगी लॅब व खाजगी क्लिनिककडून घेण्यात येणार्‍या स्वॅब टेस्टची माहिती महापालिकेला त्यांचे नाव, फोन नंबर, पत्ता, पूर्वीच्या आजाराची सर्व माहिती पालिकेला देण्यात यावी. स्वॅब घेतलेल्या नागरिकांना स्वॅब घेतल्यानंतर सात दिवसाच्या आत घरी सोडू नये.प्रतिबंधित क्षेत्रातील को-मॉर्बिड व ज्येष्ठ नागरिक या सर्वांच्या आरोग्य तपासणी करून यादी तयार करणे, जेणेकरुन कोरोना बाधित रुग्णांच्या जिवितास धोका निर्माण होणार नाही.

खाजगी क्लिनिकची यादी तयार करुन बंद असलेल्या क्लिनिकना चालू करण्यासाठी सूचना करणे, तसेच महापालिकेचे बंद असलेले क्लिनिक सुरू करून तात्काळ डॉक्टरची नेमणूक करण्यात यावी.प्रत्येक घराची घरोघरी जाऊन तपासणी करून प्रत्येक घराला मार्किंग पॉइंट करणे.प्रतिबंधित क्षेत्रात जास्तीत जास्त रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याबाबत मा. आरोग्य अधिकारी, पुणे मनपा यांना सूचना देण्यात आल्या. तसेच सदर रुग्णवाहीका रुग्णास वेळेवर उपलब्ध होणेसाठी व वस्तीमध्ये येणे व जाणेचे मार्ग त्यावेळेपर्यंत खुले करुन देणेबाबत मा. पोलिस प्रशासनास सूचना देण्यात आल्या. स्थानिक लोकप्रतिनिधी, मनपा प्रशासन, मा. पोलिस उपआयुक्त, स्थानिक पोलिस निरिक्षक, क्षेत्रिय वैद्यकीय अधिकारी यांनी दैनंदिन समन्वय साधावा.

Previous articleजेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी अँन्ड रिसर्च या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आॅनलाईन करीअर मार्गदर्शन
Next articleकुरवंडी,कोल्हारवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने बटाटा बिजप्रक्रीया मोहिम संपन्न