कुरवंडी,कोल्हारवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने बटाटा बिजप्रक्रीया मोहिम संपन्न

प्रतिनिधी : प्रमोद दांगट

आंबेगाव तालुका कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामातील पिकाच्या संवर्धनासाठी पेरणी अगोदर बिजप्रक्रीया करणे किती आवश्यक आहे यांचे प्रात्यक्षिक कृषी अधिकारी प्रमिला मडके यांनी बिजप्रक्रीया ,खंताचा डोस, आधुनिक लागवड पद्धती, या बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

त्यामध्ये बटाटा बेणे प्रक्रियेसाठी २५ ग्रॅम कार्बेन्डेझिम व रसशोषण करणार्‍या किडींसाठी लागवडीपूर्वी इमिडॅक्लोप्रिड २०० एस.एल.काही मिनिटे बुडवून घ्यावे.लागवडीपूर्वी २-५ किलो अ‍ॅझेटोबॅक्टर आणि ५०० मिली द्रवरूप अ‍ॅझेटोबॅक्टर प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बियाणे १५ मिनिटे बुडवून बीजप्रक्रिया करावी. नंतर सदर बियाणे थंड, हवेशीर ठिकाणी पसरून ठेवावे.
बीजप्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढते, पीक जोमदार येते, जमिनीत नत्राचे स्थिरीकरण होते व जमिनीतील अपायकारक रोग व किडी पासून पिकाचे संरक्षण होते.
लागवड करतांना ४५ X ३० सें.मी. ते ६० X १५ सें.मी.अंतरावर स-यात किंवा नांगरीने तास टाकून तासात लागवड करावी.
२) सुधारित जाती वापराव्यात.
३) २-३ डोळे प्रत्येक फोडीवर राहतील अशा प्रकारे बेणे बटाट्याच्या फोडी कराव्यात.
४) पेरणीपुर्वी बेणे थायरम ३ ग्रँम प्रती १ किलो क्लोरीनेटेड पाण्यात धूवून घ्यावे.
५) पेरणीसाठी बटाट्याच्या फोडी करतेवेळी कोयता ०.३ टक्के ब्लायटॉक्स या औषधाच्या द्रावणात बुडवावा.
६) लागवडीपुर्वी हेक्टरी ४० ते ५० बैलगाड्या भरखते, लागवडीवेळी वरखते हेक्टरी नत्र १०० किलो, स्फुरद ६० किलो व पालाश १२० किलो द्यावे. याप्रमाणे सखोल असे मार्गदर्शन पकरण्यात आले..
तालुका कृषी अधिकारी आंबेगाव टी के चौधरी यांनी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बिजप्रक्रीया करून बटाटा लागवड करावी असे आवाहन केले आहे. तसेच महिला शेतकरी उपस्थित होते

Previous articleमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी कंटेन्मेंट झोन असलेल्या लक्ष्मीनगर वसाहत परिसरात प्रत्यक्ष पाहणी करुन उपाययोजनांचे केले नियोजन
Next articleअँड. प्रफुल्ल गाढवे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड