जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी अँन्ड रिसर्च या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना आॅनलाईन करीअर मार्गदर्शन

वाघोली,प्रतिनिधी : जेएसपीएमच्या भिवराबाई सावंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नाॅलाॅजी अॅन्ड रिसर्च या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना झुम अॅपद्वारे आॅनलाईन करीअर बद्दल तसेच महाविद्यालयातुनच नोकरी मिळण्यासाठी लागणारी पुर्व तयारी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या 16 विविध क्षेत्रांत कार्यरत असणारे माजी विद्यार्थ्यांनी मार्गदर्शन केले. या परीसंवादामध्ये महाविद्यालयातील 100 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. या चर्चा संयोजन प्रशिक्षण व अस्थापण विभागाचे प्रमुख प्रा. अमोल गोविंदा बाविस्कर यांनी केले.

या परीसंवादामध्ये संकुलाचे संचालक डाॅ. विवेक कायंदे, डाॅ. एस. एन. पाटील, प्राचार्य डॉ. टी.के. नाराज, जेएसपीएम व टीएसएसपीएमचे विद्यार्थी प्रगती व औद्योगिक समन्वयक प्रमुख संतोष राव बोरडे, भिवराबाई सावंत पाॅलिटेक्निकचे प्रा. राघवेंद्र कडकोल व सर्व विभागाचे विभाग प्रमुख,शिक्षकही सहभागी होते.

या परीसंवादामध्ये बाईटस्केवरचे इंडिया प्रा.लि.चे संचालक मनोज मोरे पाटील, टी.सी.एस च्या आदित्य श्रीवास्तव, सायेबेजच्या हिमांगी श्रीवास्तव, टेक महिंद्राच्या राखी विश्‍वकर्मा, हेक्सावेअरचे मेलबिन वारगेशे, जीई हेल्थ केअर चे कांचन खडसे, फिझर्वच्या श्वेता व्‍यास, क्वीकयेसचे सुमित सुराणा, मीनी ऑंरेजचे शुभांगी गुळवे, फिनास्ट्राच्या साक्षी खुडा, एल अँड टी इन्फोटेकच्या श्वेता गोयल, मेकासाॅफ्ट कॅड कॅमचे मानसिंग पाटील, अॅन्सेचरच्या योगिता पडवळ, डासाल्ट सिस्टीमचे अमोल मुत्येल्य, अटाॅस सिंटेलचे शुभांगी कोळपकर यांनी विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले, तसेच विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.यावेळी महाविद्यालयाचे प्रशिक्षण व अस्थापण विभागाचे प्रमुख प्रा. अमोल गोविंदा बाविस्कर यांनी सर्वांचे आभार मानले.

Previous articleएमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम येऊन पोलीस उपअधीक्षकपदी निवड झालेल्या कु.आरती पवारचा ‘लोहार युथ फाउंडेशन’च्या वतीने सत्कार
Next articleमहापौर मुरलीधर मोहोळ यांनी कंटेन्मेंट झोन असलेल्या लक्ष्मीनगर वसाहत परिसरात प्रत्यक्ष पाहणी करुन उपाययोजनांचे केले नियोजन