एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम येऊन पोलीस उपअधीक्षकपदी निवड झालेल्या कु.आरती पवारचा ‘लोहार युथ फाउंडेशन’च्या वतीने सत्कार

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन — प्रतिनिधी

बारामती नगरपरिषदेत कर व प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करणाऱ्या पुणे जिल्ह्यातील,दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा या गावच्या लोहार समाजातील कु.आरती राजेंद्र पवार या एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात प्रथम येऊन पोलीस उपअधीक्षक(डी.वाय.एस.पी) झाल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपअधीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत ४४४ गुण मिळवून आरती पवार या भटक्या विमुक्त जाती(एन.टी. बी) प्रवर्गामध्ये मुलींमध्ये राज्यात प्रथम आल्या. यापूर्वी त्या पोलीस उपनिरीक्षक पदाच्या परीक्षेतही उत्तीर्ण झाल्या होत्या. तर मंत्रालय कक्ष अधिकारी म्हणूनही त्यांची निवड झाली होती. पोलीस उपअधीक्षक(डी.वाय.एस.पी) पदी निवड होऊन भरगोस यश प्राप्त केल्याबद्दल आरती राजेंद्र पवार यांचा लोहार युथ फाउंडेशनच्या वतीने सत्कार/सन्मान समारंभ कार्यक्रम देऊळळगाव गाडा(ता.दौंड) या आरतीच्या मूळ गावी पार पडला. यावेळी डी.वाय.एस.पी कु.आरती राजेंद्र पवार यांच्यासह आरतीचे वडील राजेंद्र बबन पवार सर,आई वैशाली राजेंद्र पवार,आजोबा बबन पवार,आजी द्रुपदा पवार यांचा सत्कार/सन्मान लोहार युथ फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य मुख्य संघटक किशोर सोनवणे,राज्याचे सचिव नितेश लोखंडे,राज्याचे खजिनदार सुशीलकुमार विघे,मध्य महाराष्ट्राचे संघटक विजय हरिहर, लोहार युथ फाउंडेशनचे पुणे जिल्हा प्रमुख पत्रकार विजयराव लोखंडे,जिल्हा शिक्षण प्रमुख संदिप पवार आदिंच्या हस्ते सत्कार पार पडला.

याप्रसंगी भगवान पवार,प्रल्हाद पवार,बाळासो पवार,दत्तात्रय हरिहर,अतुल पवार,गणेश नवगण,सागर चव्हाण,महेश थोरात,सुनील पोपळघट,राजेंद्र पवार,किरण चव्हाण,महादेव पवार,अजित पवार,अक्षय पवार,अमोल पवार,रितेश पवार,निखिल हरिहर,गणेश पवार,आकाश पवार,निलेश हरिहर आदी लोहार समाज बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते.तसेच आरतीची (डी.वाय.एस.पी) पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन लोहार युथ फाउंडेशनच्या राज्याच्या अध्यक्षा दिपाली रविंद्र विघवे,राज्य उपाध्यक्षा शितल संजय खंडागळे,जिल्हा संघटक विजय थोरात,पुणे शहर प्रमुख अभिजित पवार,पिंपरी चिंचवड शहर प्रमुख मनोज हरेर,जिल्हा उद्योग प्रमुख बबन चव्हाण,पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख मनोज लोखंडे,बारामतीचे तालुका प्रमुख बबन थोरात आदी अनेक राज्यातील व जिल्ह्यांतील लोहार युथ फाउंडेशनच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

यावेळी आरती पवार मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या,मी हे पद माझे वडील राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व माझ्या पवार कुटुंबाच्या आशीर्वादरुपी खूप अभ्यास करून मिळवले आहे.आपला लोहार समाज मागासलेला असल्याने लोकांची अशी मानसिकता आहे या समाजात जास्त सुशिक्षित नाहीत परंतु माझ्या प्रयत्नांना यश येऊन मला हे डी.वाय.एस.पी पद मिळाल्याने लोकांची मानसिकता थोडी तरी बदललेली असेल की,आता हा लोहार समाज सुधारलेला आहे.खरे तर माझे स्वप्न उप जिल्हाधिकारी हे पद मिळवायचे होते परंतु आपल्या लोहार समाजाच्या कँटेगरीला आरक्षण कमीत कमी असल्याने ती जागा निघाली नाही.परंतु माझे हे सांगणे आहे की,आपल्या कँटेगरीला जागा निघाली नाही म्हणून आपल्या समाजातील विद्यार्थ्यांनी स्वस्त बसू नये तर इतर ठिकाणी किंवा ओपनमधून अर्ज भरून सुद्धा प्रयत्न करून यश मिळवायला पाहिजे.अशी सर्वांनी मानसिकता ठेवा.पुढे आरती पवार म्हणाले,मी स्वतःही यापुढे लोहार समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यांचे स्वतःचे करियर घडविण्यासाठी स्पर्धा-परीक्षांचा अभ्यास कसा करावा यासाठी मार्गदर्शन करेल.तर शिक्षणाविषयी लोहार समाजातील कोणीही अडचण घेऊन आले तर मी त्यांना नक्कीच मदत करेन.तर लोहार समाजातील गोर,गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन यश प्राप्त करावे यासाठी मार्गदर्शनरुपी लागणारी मदत मी स्वतःकरेल.

या सत्कार समारंभ कार्यक्रमामध्ये प्रास्ताविक लोहार युथ फाउंडेशनचे पुणे जिल्हा प्रमुख पत्रकार विजयराव लोखंडे यांनी केले.तर उपस्थितांना मार्गदर्शन लोहार युथ फाउंडेशनचे राज्य मुख्य संघटक किशोर सोनवणे यांनी केले.तर कार्यक्रमाचे आभार आरतीचे वडील राजेंद्र पवार सर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन देऊळगाव गाडा या गावातील लोहार समाज बांधवांनी व विजय हरिहर,पत्रकार विजयराव लोखंडे यांनी केले.

आरती पवार व देऊळगावातील लोहार समाज बांधवांनी मानले ‘लोहार युथ फाउंडेशनचे’ आभार
सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलताना आरती पवार म्हणाल्या,माझ्या लोहार समाजाच्या वतीने माझा व माझ्या संपूर्ण कुटुंबांचा प्रत्यक्षात आमच्या गावी लोहार युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन जो सत्कार केला तो प्रशंसनीय आहे.त्यामुळे आमचे कुटुंब,परिवार आनंदमय आहे.

तसेच लोहार युथ फाउंडेशन ही लोहार समाजाची संघटनाही शिक्षण व आदी क्षेत्रात उत्तम काम करीत आहे.मागील वर्षी “लोहार युथ फाउंडेशनने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात” भोसरी येथे “माझा विशेष सत्कार/सन्मान करून मला नवे उत्तेजन,प्रेरणा देण्याचे काम केले होते”. व आजही मला यश मिळाल्यानंतर लोहार युथ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी येऊन जो माझा व माझ्या कुटुंबाचा सत्कार,सन्मान केला.हे आम्ही कधीच विसरू शकत नाही.त्याबद्दल मी व माझे कुटुंब हे ‘लोहार युथ फाउंडेशनचे’ आभारी आहोत.तसेच यावेळी आरतीचा जाहीर सत्कार केल्याबद्दल देऊळगावातील लोहार समाज बांधवांनीही लोहार युथ फाउंडेशनचे आभार मानले.