ह्युमन हेल्प फाउंडेशन’ची दिवाळी गोरगरीबांच्या सोबत साजरी

दिनेश पवार,दौंड

ह्युमन हेल्प फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिवाळी चा सण गोरगरीब जनतेसोबत साजरा करण्यात आला, यावर्षी सर्वच सण,उत्सव बंद करावे लागले.कोरोना सारख्या महाभयानक रोगाचा प्रादुर्भाव संपूर्ण जगावरती पडला नि सगळी अर्थव्यवस्था जवळपास 8 ते 9 महिने ठप्प होती,रोजगार बंद झाले,सगळं जग लोकडाऊन झाले आशा परिस्थितीत सर्वसामान्य जनतेसमोर बरेच प्रश्न उभे राहिले त्यातील महत्वाचा घटक म्हणजे आर्थिक अडचण सगळं जगच बंद असल्याने पैसा येणार कोठून आशा परिस्थितीत आलेले अनेक सण रद्द करावे लागले तर काही सण साध्या पणाने साजरे करावे लागले,मात्र दिवाळी हा सण सर्वांच्या आनंदाचा,उत्साह वाढवणारा सण तोही काही गोरगरीब जनतेला साजरा कसा करावा हा प्रश्न उभा होता यातील काही भार ह्युमन हेल्प फाउंडेशनच्या सदस्यांनी उचलून यावर्षीची दिवाळी गोरगरीब मुलांसोबत साजरी केली.

या उपक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष पवन साळवे,उपाध्यक्ष प्रज्ञेश कांबळे,सचिव शेखर पाळेकर,खजिनदार सुमीत गायकवाड,राहुल कोकरे ,किरण गायकवाड यांनी सहभाग घेतला तर या महत्वपूर्ण उपक्रमास यशस्वी करण्यासाठी कुणाल वाघमारे, पिंकू झेंडे,प्रमोद रानेरजपुत, निखिल स्वामी युनूस पानसरे यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleदीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद!
Next articleपिंपरी बु || मध्ये लहानग्यांनी साकारले मातीचे विविध गडकिल्ले