दीड लाखांचे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला जेरबंद!

राजगुरूनगर- शहरातील गणेश ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानात दागिने मोडण्यासाठी आलेल्या महिलेचे दागिने चोरणाऱ्या दोन महिलांना सीसीटीव्हीच्या फुटेजच्या आधारे पोलिसांनी जेरबंद केले आहे.त्यांच्याकडून दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

सुरेखा ज्ञानेश्वर पवार (वय २५) सविता गणेश पवार (वय २५ वर्षे, वर्षे दोन्ही रा.वडी गोदरी ता.आंबड जि.जालना) अशी अटक करण्यात आलेली महिलांची नावे आहेत

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, राजगुरूनगर शहरातील गणेश ज्वेलर्स या दुकानात सोन्याचे दागिने मोडण्यासाठी आलेल्या हुसेन सादिका शेख (वय २४) या महिलेचे दि ९/१०/२०२० रोजी अज्ञात महिलेने दागिने चोरून नेले होते.याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.या गुन्हाचा तपास करत असताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन संशयित महिला आढळून आल्या होत्या संशयित महिला व दागिन्यांचा शोध घेत असताना पो.कॉ.स्वप्नील गाढवे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, सी.सी.टी.व्ही फूटेज मधील दिसत असलेल्या महिला या वडी गुद्री ता.आंबड जि.जालना येथील असल्याचे समजले व त्या महिलांना नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गु.र.न.५८१/२०२० भा.द.वि.कलम ३९२,३४ मध्ये अटक केली असल्याचे समजले त्याप्रमाणे खेड पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरीक्षक राहुल लाड, पो.कॉ.स्वप्नील गाढवे व पो.काँ. निखील गिरीगोसावी, म.पो.कॉ. निलम वारे, म.पो.कॉ.सिमा पाटील यांचे पथक नाशिक रोड जेल पोलीस स्टेशन येथे रवाना झाले. त्यांनी सदर गुन्हयातील संशयीत महिला यांना नाशिक जेल येथुन ताब्यात घेवुन खेड पोलीस स्टेशनला आणले. तेथे त्यांचे चौकशी करून त्यांनी त्यांचे नाव १) सुरेखा ज्ञानेश्वर पवार वय २५ वर्षे, २) सविता गणेश पवार वय २५ वर्षे, वर्षे दोन्ही रा.वडी गोदरी ता.आंबड जि.जालना असे असल्याचे सांगितले. त्यांना पोलीसी खाक्या दाखविताच त्यांनी खेड येथील गणेश ज्वेलर्स नावाचे दुकानातील महिलेचे सोने चोरून नेले असल्यावे कबुली दिली आहे. सदर महिलांकडुन गुन्हयातील ५० ग्रॅम वजनाचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. त्यांचेकडुन आतापर्यंत एकुण १,५०,०००/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांचेकडे अधिक चौकशी चालु आहे.

सदरचा घडलेला गुन्हा उघडकीस आणणे कामी पोलीस निरीक्षक सतिष गुरव तसेच सहायक पोलीस निरीक्षक राहुल लाड, पोलीस कॉन्स्टेबल सचिन जतकर, पो.कॉ.निखील गिरीगोसावी, पो.कॉ.स्वप्नील गाढवे, पो.कॉ.शेखर भोईर, म.पो.पंचरास, सिमा पाटील, निलम वारे, वाघाले यांनी महत्वपुर्ण कामगिरी बजावली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले हे करीत आहेत.

Previous articleडेहणे येथे रक्तदान शिबीर संपन्न,सोशल मिडीयाच्या माध्यमातून रक्तदानाचा अभिनव उपक्रम
Next articleह्युमन हेल्प फाउंडेशन’ची दिवाळी गोरगरीबांच्या सोबत साजरी