Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चाकण-शिवरायांचा व गड किल्ल्यांचा इतिहास जतन करण्यासाठी व विद्यार्थांंच्या कलागुणांना वाव देण्यासाठी पिपंरी बु|| गावामध्ये खास दिवाळी निमित्त किल्ले बनवा स्पर्धेचे विकासदादा ठाकूर मित्रपरिवाराच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण ७६ स्पर्धेक सहभागी झाले होते निवड समितीने या सर्व स्पर्धकांच्या घरोघर जाऊन किल्ल्यांची पहाणी केली.
यापहाणी मध्ये प्रामुख्याने प्रतिकृती, किल्ला बांधकाम, साहीत्य,स्पर्धा उद्दिष्टपूर्ती, सादरीकरण या पाच मुद्यानां अनुसरून मुल्यांकन करुन पुढीलप्रमाणे निकाल जाहीर केला आहे.

प्रथम क्रमांक सानिका शांताराम शिवले,द्वितीय क्रमांक ओम कुलदीप वाळुंज,चैतन्य दत्तात्रय शिवले,तृतीय क्रमांक भावेश कमलेश कर्नावट,चतुर्थ क्रमांक रिया सत्यवान वाळुंज
उत्तेजनार्थ-यशराज मल्हरी राळगे,समीर सुधीर मोहीते, प्रथमेश भानुदास सुतार,नेहल शरद ठाकूर,विराज राहुल ठाकूर, तनिषा विकास वाळुंज
प्रथम क्रमांकास 5000 रुपये व शिवप्रतिमा,द्वितीय क्रमांकास 3000 रुपये व शिवप्रतिमा, तृतीय क्रमांकास 2000 रुपये व शिवप्रतिमा, चतर्थ क्रमांकास 1000 व शिवप्रतिमा व सर्व सहभागी स्पर्धकांना भेटवस्तू या प्रमाणे बक्षिसे देण्यात आली.
निवड समितीमध्ये परिक्षक म्हणून ठाकूर डी.डी, हुंडारे के. एस , ठाकूर के.पी , ठाकूर आर.के,गोर्हे वि.डी,ठाकूर जी. एल,ठाकूर एस.बी. यांनी काम पाहिले.
या स्पर्धचे प्रायोजक रामराव ठाकूर, किरण गुळवे, निलेश ठाकूर, गणेश कोळेकर, गणेश हुंडारे,प्रकाश भोसले,रोहिदास हुंडारे,किरण वाळुंज,सत्यवान वाळुंज,सचिन ठाकूर,शांताराम शिवले,अभिजित भुजबळ हे प्रमुख प्रायोजक होते.
या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ आज दिपावली पाडव्याच्या मुहूर्तावर निवड समिती, प्रायोजक व आयोजक यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
Download WordPress Themes Nulled and plugins.