खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी चंद्रकांतदादा वारघडे यांच्या सामाजिक कार्याचे केले कौतुक

Ad 1

पुणे-माहिती सेवा समिती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोविंद वारघडे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच आमदार अशोक बापू पवार यांच्यासह विविध संस्थांनी त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

माहिती सेवा समिती या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वारघडे हे दुष्काळी भागात जनावरांना चारा वाटप, जलसंधारण , वृक्षलागवड, रक्तदान शिबिरे, अन्नदान अशा स्वरुपाचे उपक्रम राबविण्यात आले आहेत.तसेच शासनाच्या वेगवेगळ्या योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविणे गरजूंना सर्व प्रकारची मदत करणे ही कामे करून सामाजिक बांधिलकी जपत आहे. त्यांच्या या कार्याची दखल विविध सामाजिक संघटना, संस्था यांनी घेतली असून तसेच खासदार डॉ. अमोल कोल्हे ,आमदार अशोक पवार यांनीही त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. वारघडे हे पुढील काळात ही सामाजिक कार्य सुरू ठेवून जनतेची सेवा करत राहतील असे म्हणत खासदार कोल्हे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.