रक्तदान हेच जीवनदान ते वाचवते दुसऱ्याचे प्राण – दादासाहेब भोंडवे

अमोल भोसले,उरुळी कांचन

अखिल भारतीय मराठा महासंघ हवेली तालुक्याच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन ससुन बल्ड बँकेच्या सहकार्याने करण्यात आले होते.याप्रसंगी अनेकांनी रक्तदान केले रक्तदान करु या आणि प्रेमाचे नाते जोडुया गंगेचे पाणी आटणार नाही आणि आम्ही रक्तदान करने सोडनार नाही असा संदेश अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने देण्यात आला.

याप्रसंगी अखिल भारतीय मराठा महासंघ हवेली तालुका अध्यक्ष दादासाहेब भोंडवे, हवेली तालुका महिला अध्यक्षा नंदनी मुरकुटे, हवेली तालुका युवक अध्यक्ष प्रशांत कोतवाल, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख गोरख कामठे, जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब चौधरी, तालुका संघटक सुनिल तुपे, आदेश तुपे, किरण सावंत, सुरेखा कांचन इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Previous articleशिरोली येथील श्री गौधन डेअरी फार्म मध्ये बसूबारस उत्साहात
Next articleखासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी चंद्रकांतदादा वारघडे यांच्या सामाजिक कार्याचे केले कौतुक