वसुबारसने दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

कृषी संस्कृतीत दिवाळी सणाचे महत्त्व आगळे वेगळे आहे. खरिप हंगाम हाताशी येतो धनधान्याची समृद्धी लाभते आणि बळिराजाच्या पारावार उरत नाही. यंदा खरिपाने हात दिला नसला. तरी थंडीची किनार लाभलेला दिवाळी षण वसुबारसने सुरु झाला. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस पूर्व हवेली तालुक्यात ठिकठिकाणी आपल्या परिसरात रांगोळी काढून व सांयकाळी वासरा समवेत गाईची पूजा करण्यात आली.

यावेळी मेमाणे फार्मचे मालक किशोर मेमाणे यांनी आपल्या कुटुंबातील सदस्या समवेत गाई व वासराची पुजा केली.

दिवाळीच्या निमित्ताने येथील बाजारपेठ भरल्या असल्याने ग्राहाकाची गर्दी पाहायला मिळाली मात्र येथील पोलीस प्रशासनच्या चोख बंदोबस्त ठेवल्याने गर्दी आटोक्यात आली.