आधार” लघुपटातुन माणुसकीची शिकवण

Ad 1

दिनेश पवार,दौंड

आधार,गोष्ट माणुसकीची या कोरोना विषयी व माणुसकी विषयी जनजागृती करणाऱ्या लघुपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे,

कोरोना सारख्या महाभयानक प्रादुर्भावाने संपूर्ण जगाला लोकडाऊन केले जगातील स्वप्ननगरी म्हणून गणल्या जाणाऱ्या शहरातही शुकशुकाट दिसत होता, जो तो स्वतःचे रक्षण करण्यासाठी स्वतंत्र,अलिप्त राहू लागला,यामुळे माणूस माणसापासून दूर जात चालला होता, संकट काळी धावून येणारे सगेसोयरे दरवाजे बंद करून बसू लागला शेवटी सरकारला सांगावे लागले आपल्याला रोगाशी लढायचे आहे, रोग्याशी नाही, सोशल डिस्टन्स,सॅनिटायजर, मास्क वापरून सुरक्षित पणे राहून हा कोरोना नष्ट करायचा आहे माणुसकी नव्हे नि हाच संदेश ग्रामीण भागातील युवकांनी तयार केलेल्या आधार गोष्ट माणुसकीची या लघुपटातून समाजमनात प्रसारित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,न्यु बालाजी एंटरटेनमेंट प्रस्तुत, सुनील नेटके दिग्दर्शित आधार गोष्ट माणुसकी यातून नाती सर्वश्रेष्ठ आहेत,तसेच मैत्री ही संकटकाळी धावून येणारी महत्वपूर्ण गोष्ट असल्याचे या लघुपटात सांगितले आहे.

यामध्ये विजय ओहळ,शीतल शिंदे,ओम माने,शलाक गायकवाड, दिनेश पवार, संजय कांबळे, श्रीनाथ काटे,राजेंद्र सोनवलकर, राजेश सलगर या कलाकारांनी काम केले आहे, तर कोरोना विषयी माहिती पोलिस निरीक्षक सुनील महाडिक,उपजिल्हा रुग्णालय दौंड चे वैद्यकीय अधीक्षक संग्राम डांगे,नगरसेविका अरुणा डहाळे,नगरसेवक जीवराज पवार यांनी सांगितली आहे, कॅमेरा व एडिटिंग लखन वाणी,छायाचित्रे संकेत क्षीरसागर यांनी केले आहे