जनसामान्यांचा ‘पांडूरंग’ पुन्हा एकदा जनसेवेत

Ad 1

अमोल भोसले,उरुळी कांचन

आपल्या वकृत्व – कर्तृत्वाने – नेतृत्वाने तसेच धाडसी कामाच्या धडाकेबाज शैलीमुळे जनमाणसात वेगळी उंची निर्माण करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार हे प्रचंड ‘जिद्दी’ आणि ‘संवेदनशील’ आहेत. हे गेला आठवडाभर अवघ्या महाराष्ट्रानं अनुभवलंय. स्वत:ला ‘अस्वस्थ’ वाटत असताना सुध्दा वसा आणि वारसा लोकन्नतीचा घेतलेला त्यांच्यातला ‘माणूस’ त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता. म्हणूनचं त्यांनी ‘गृहविलगीकरणातून’ काम सुरुचं ठेवण्याचा ‘धाडसी’ निर्णय घेतला. तशाही अवस्थेत प्रशासकीय बैठकांना ‘व्हिडीओ कॉन्सपर’द्ववारे हजेरी लावून दादांनी राजाच्या हिताचे व लोकभिमुख कामे मार्गी लावली. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला या ‘कोरोनादूत’ नेत्याच्या ‘कामगिरी’चा हेवा वाटला.

दस्तरखुद ‘देवगिरी’नेही असे चित्र ‘पहिल्यांदा’ अनुभवलं असेल. मात्र त्याचवेळी दादांना ‘कोरोना’ची लागण झाली आणि पहाडालाही भेदणारा हा जनसामान्यांचा ‘पांडूरंग’ मुंबईच्या ‘ब्रीच कॅन्टी’मध्ये दाखल झाला. राज्याच्या कानाकोपऱ्यात हि ‘बातमी’ वाऱ्यासारखी पसरली आणि महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेनं दादाच्या तब्येतीबद्दल चिंता व्यक्त केली. तेथूनही त्यांनी ‘कोरोना’बाधित असलेल्या आपल्या सहकाऱ्यांविषयी सोशल माध्यमातून ‘काळजी’ व्यक्त केली.

त्यांच्यातलं हे ‘हळवं’ आणि ‘संवेदनशील’ मन पाहून त्यांचे सहकारीही निशब्द झाले होते. ‘कोरोना’शी दोन हात करताना राज्याच्या अर्थकारणातला ‘संकटमोचक’ ठरलेल्या या नेत्यासाठी विद्यार्थी, तरूण, महिला, जेष्ठ नागरिक यांच्यासह सर्व स्तरातील लोकांनी ‘प्रार्थना’ केली. मायमाऊल्यांनी आशीर्वाद दिला. वाडीलढाऱ्यांनी आपुलकी व्यक्त केली. त्याचं आपुलकी आणि आशीर्वादाच्या बळावर दादांनी ‘कोरोना’वर विजय मिळविला आहे.

तब्बल एक आठवडा रूग्नालयात ‘मुक्काम’ केल्यानंतर दादा पुन्हा एकदा ‘देवगिरी’वर दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्यासाठी अवघ्या महाराष्ट्रानं केलेल्या ‘प्रार्थनेस’ यश आलं आहे. आता नव्या जोमानं व नव्या उमेदीनं दादा धावपळ करताना दिसतील. धाडसी निर्णय घेताना दिसतील. दौरे करताना दिसतील. कारण महाराष्ट्राच्या प्रगतीचं भविष्य पाहाणारा हा नेता ‘कणखर’ नि ‘रोखठोक’ आहे. म्हणूनचं…. जनसामान्यांचा ‘पांडूरंग’ पुन्हा एकदा जनसेवेत रूजू झालाय.