तुळापूर येथे किरकोळ भांडणातून डोक्यात खोरे मारून मजुराचा खून,

Ad 1

गणेश सातव,वाघोली,पुणे

तुळापूर गावच्या हद्दीत कळमदरा येथे सर्व्हे नं १४४ मधील शेतात मनोऱ्याचे बांधकाम सुरु असताना किरकोळ भांडणातून कामावरील सहकारी उत्तम राजेंद्रनाथ नासकर (वय 46 वर्षे, रा.पश्चिम बंगाल) याचे डोक्यात खोऱ्याने मारून त्यास जिवे ठार मारण्यात आले.फिर्याद दाखल होताचं लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी स्वतः गुन्हे शोध पथकासह घटनास्थळी धाव घेतली.संशयित आरोपी बाबत माहिती घेतली असता तो कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरत नसल्याने त्यास पकडणे तसे अवघड होते.

Ad 3

परंतु फिर्यादी व त्यांचे बांधकामावरील काँट्रॅक्टर रिझाऊल अब्दुल मुल्ला यांनी दिलेल्या आरोपीच्या वर्णनानुसार त्याचा लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या टीम करून शोध घेण्यात आला असता गुन्हे शोध पथकाला सदर आरोपी हा तुळापूर येथील फॉरेस्टच्या जागेत एका झाडाखाली बसलेला मिळून आला.त्यास ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रॉबिन शोयलिन सद्दार (वय 27 वर्षे, रा. जयनगर, पश्चिम बंगाल )असे सांगून रात्री उत्तम व त्याचेमध्ये शाब्दिक वाद होऊन त्याच रागात त्याचे डोक्यात खोऱ्याने मारलेबाबत त्याने सांगून आपला गुन्हा कबूल केला.आरोपी सध्या पोलीस कोठडीमधे असून घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे करीत आहेत.

सदर कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख,अतिरिक्त पोलीस अधीक्षक विवेक पाटील,पोलीस निरीक्षक प्रताप मानकर या वरिष्ठांच्या मार्गदर्शना खाली सहा.पोलीस निरीक्षक केशव वाबळे,पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर,गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे,श्रीमंत होनमाने,दत्ता काळे,समीर पिलाने,ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड,सूरज वळेकर यांनी केली आहे.