बंदी झुगारून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पाच जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Ad 1

पुणे-आंबेगाव तालुक्यातील रानमळा (लोणी) येथे बैलगाडा शर्यतीवर असलेली बंदी झुगारून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी प्रकरणी पाच जणांवर मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून याबाबत पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी फिर्याद दिली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांना मिळालेल्या गुप्त बातमीदार मार्फत माहितीनुसार लोणी गावच्या हद्दीत रानमळा येथील बैलगाडा घाटात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले आहे, ही माहिती मिळताच श्री.खराडे यांनी पोलीस नाईक राजेंद्र हिले पोलीस हवालदार आर.जे. करंडे यांना तातडीने रानमळा येथे जाण्यास सांगितले असता, त्या ठिकाणी काही इसम बैलांना घाटातून पळवत असल्याचे निदर्शनास आले.

बैलगाडा शर्यत बंदी असताना असे सांगून देखील बैलगाडा शर्यत चालू ठेवल्याने स्वप्निल गणेश डोके, विलास गावडे , संतोष महादू बडेकर , उत्तमराव बाळासाहेब रणपिसे , विठ्ठल रंगनाथ ढोबळे   व इतर बैलगाडा मालक यांनी बैलगाडा शर्यत बंदी असताना देखील बैलगाडा शर्यतीचे आयोजन करून बैलांना यातना पीडा होईल अशाप्रकारे निर्दयपणे वागून बैल गाडीला जुंपून बैलगाडी सह चढणीच्या रस्त्याने घाटात चढायला त्यांच्या क्षमतेपेक्षा व ताकदी पेक्षा बैलांचा छळ केला म्हणून पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी फिर्याद दाखल केली आहे .पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत.

Previous articleकळंब येथे तीन बिबट्यांच्या हल्ल्यात गाय ठार
Next articleतुळापूर येथे किरकोळ भांडणातून डोक्यात खोरे मारून मजुराचा खून,