कळंब येथे तीन बिबट्यांच्या हल्ल्यात गाय ठार

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील कळंब येथे तीन बिबट्यांनी हल्ला करून  गोठ्यातील गायीला ठार केले आहे,कळंब परिसरात सतत होणाऱ्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे नागरिकांनी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.

कळंब येथील भैरवनाथ मळा येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन बिबट्यांनी एकत्र येऊन गाय वर हल्ला केला आहे य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, भैरवनाथ मळा येथील शेतकरी बबन सखाराम भालेराव यांच्या घराजवळ त्यांच्या सहा गाईंचा गोठा आहे रविवारी मध्यरात्री,गायांचा मोठ्या प्रमाणावर थांबण्याचा आवाज आल्यामुळे भालेराव यांना जाग आली त्यांनी गोठ्याकडे पाहिले असता तीन बिबटे गाईला ओढत असल्याचे त्यांनी पाहिले आरडाओरड केल्यानंतर त्यांनी धूम ठोकली असून आज सकाळी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे, मात्र कळंब, चास, नारोडी व नदीकाठची सर्वच गावांमध्ये बिबट्याच्या वारवर हल्ल्यामुळे शेतकरी त्रस्त झाला असून, या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडत आहे मात्र, ग्रामस्थ अनेक वेळा मागणी करून देखील पिंजरा वनखात्याकडून लावला जात नसल्याने, मनुष्यावर हल्ला करून मनुष्य ठार झाल्यावर पिंजरा लावणार का अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे.

Previous articleभोसे येथे जमीन मोजणीच्या वादातून एकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल
Next articleबंदी झुगारून बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी पाच जणांवर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल