शेती करतोय म्हणून अपराधीपणा वाटून घेऊ नका-राजाभाऊ कदम

दिनेश पवार,दौंड

शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे,शेतकरी असंख्य समस्या ना तोंड देत शेती करत आहे,त्याच्या कष्टामुळे आज आपल्याला अन्न मिळते तो खरा लाखोंचा पोशिंदा आहे, तरी देखील मनात कमतरता ठेवून हा शेतकरी जगत असतो,पण शेती करतोय म्हणून अपराधीपणा वाटुन घेऊ नका,दिलखुलास जगा, जिंदादिल रहा असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रणित स्वाभिमानी पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी व्यक्त केले आहे.

शेतकरी हा कष्ट करून,मेहनतीने शेतात पिक घेतो त्यामुळे शेतीमालाला पुरेसा भाव मिळणे खूप गरजेचे आहे, ते शेतकऱ्यांना म्हणतात की जेव्हा पैसे मिळवाल तेंव्हा स्वतःसाठी, कुटुंबासाठी मनोसोक्त खर्च करा,त्यामुळे कष्ट करताना उमेद वाढेल,वारेमाप कर्ज काढून ते फेडण्यासाठी व त्याच्या व्याजासाठी कुटुंबाला राबवून त्यांच्या दुःखाला कारण ठरू नका,जग बदलतय शेतकऱ्यांनी ही बदलले पाहिजे, आपल्या बापजादयानी खूप काही भोगलं ते आपल्याला चांगले दिवस यावेत म्हणून तो उद्धेश आपण पूर्ण केला पाहिजे.

शेतकरी हा एक ब्रँड आहे,तो आऊटडेटेड होता कामा नये,उगाच शेतकऱ्यांना पोरी देईनात म्हणून टिका करत बसण्यापेक्षा आपण बदलत्या काळानुसार बदल घडवून आधुनिक शेती,औजारे, बी-बियाणे यांचा योग्य वापर करून योग्य त्या दिशेने शेती केली तर शेतकऱ्यांसारखा मोठा कोणी होऊ शकत नाही किंवा त्याची तुलनाही कोणी करू शकणार नाही,कोणी काही म्हणो या जगात शेती शिवाय दुसरा चांगला पर्यायच नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे, म्हणून शेतकऱ्यांनी प्रयोगशील, प्रगतशील, बनण्यावर भर दिल्यास शेतीला ब्रँड बनवू हा निर्धार मनात ठेवला पाहिजे

Previous articleवेगरे’च्या सरपंच निवडीकडे सर्वांचे लक्ष ….ग्रामपंचायत सदस्य गेले देवदर्शनाला
Next articleएस.टी.कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन नाही कारवाई करण्याची इंटक ची मागणी