एस.टी.कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन नाही कारवाई करण्याची इंटक ची मागणी

Ad 1

दिनेश पवार,दौंड

एसटी कर्मचाऱ्यांना माहे ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर या तीन महिन्याचे वेतन न दिल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस(इंटक) ने केली आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत उपक्रम असून राज्यातील गोरगरीब, सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी आहे, सध्या एस.टी महामंडळ मध्ये 1 लाख कर्मचारी कार्यरत आहेत, महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार व रा.प.महामंडळाच्या आदेशानुसार रा. प.कर्मचारी रात्रंदिवस काम करीत आहेत, परंतु एस.टी. कर्मचाऱ्यांना मात्र गेल्या तीन महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही, ते लवकर देण्यात यावे न केल्यास त्वरित कारवाई करावी अशी मागणी इंटक च्या वतीने कामगार उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन न दिल्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे, कर्जबाजारी होण्याचे प्रमाण वाढले आहे,एक तर या कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे आणि तेही वेळेवर होत नसल्याने कित्येक समस्यांना सामोरे जावे लागत आहे,त्यामुळे हा प्रश्न लवकर सोडवावा अशी मागणी करण्यात आली आहे,या निवेदनावर विभागीय अध्यक्ष राजाभाऊ काळोखे,राज्य कार्यकारणी सदस्य असिफ मुल्ला,सूर्यकांत कांदे,राज्य सहसचिव दत्तात्रय तिगोटे यांच्या सह्या आहेत.