शॉटसर्किटमुळे घराला लागलेल्या आगीत ३०० लक्ष्मी झाडू जळाले

प्रमोद दांगट : निरगुडसर

लोणी ( ता. आंबेगाव ) येथील पंचरासवस्ती येथे शॉर्टसर्किट होऊन घराला लागलेल्या आगीत घरातील दिवाळी निमित्त लक्ष्मीपूजन साठी बनवलेले 300 लक्ष्मी झाडू, कपडे ,वीज मीटर जळून खाक झाले असल्याची घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार लोणी येथील पंचरासवस्ती येथे सुभाष जयवंत पंचरास हे आपल्या कुटुंबा समवेत राहत असून शुक्रवार दिनांक ६ रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली या आगीमध्ये त्यांनी दिवाळीनिमित्त बनवलेले 300 लक्ष्मी झाडू जळाले तसेच घरातील कपडे, फिटिंग वायर वीज मीटर ,जळाल्याने त्यांचे अंदाजे पंधरा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्या वेळी घरात सुभाष पंचरास, त्यांची पत्नी, मुले, यांनी आरडाओरडा केल्याने शेजारच्यांनी तात्काळ आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

पंचरास कुटुंबीय यांचा वाजंत्री ताफ्याचा व्यवसाय असून कोरोना मुळे व्यवसाय बंद आहे.त्यामुळे त्यांनी दिवाळीत लक्ष्मीपूजन साठी लक्ष्मी झाडू विक्रीसाठी बनविले होते. लक्ष्मी झाडू विकून दिवाळी आनंदात साजरी करण्याची अपेक्षा असतानाच या शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत त्यांचे लक्ष्मी झाडू जळाल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कोरोना काळात अगोदरच आर्थिक अडचणीत सापडलेल्या या कुटुंबाला मोठा आर्थिक फटका बसला असून समाजातील दानशूर व्यक्तींकडून मदत मिळावी अशी अपेक्षा या कुटुंबाला आहे.

Previous articleमासेमारी करायला गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू
Next articleवहागावच्या शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे मोफत बियाणे वाटप