मासेमारी करायला गेलेल्या मामा-भाच्याचा तळ्यात बुडून मृत्यू

Ad 1

प्रमोद दांगट, निरगुडसर

आंबेगाव तालुक्यातील लाखणगाव (धरमवस्ती) येथील महादेवाचा तलाव येथे मासे पकडण्यासाठी गेलेल्या ठाकर समाजाच्या मामासह भाच्याचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार ,लाखणगाव धरमवस्ती येथे वास्तव्यास असलेल्या व शेतात मोलमजुरी करणाऱ्या ठाकर समाजाचे संजय शिवराम केदारी (वय ,३२ ) व ऋषिकेश विजय काळे ( वय ,८) हे मामा भाचे सकाळच्या वेळेस धरमवस्ती येथील महादेव तलाव येथे मासे पकडण्यासाठी गेले होते. मासे पकडण्यासाठी तलावात उतरले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने व चिखल खूप असल्याने चिखलात पाय रुतल्याने तलावात बुडून मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती कळताच मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नीलेश खैरे ,विठ्ठल वाघ,पोलीस पाटील कल्पिता बोऱ्हाडे, सरपंच प्राजक्ता रोडे,यांनी घटनास्थळी भेट दिली स्थानिक ग्रामस्थ विक्रम राजाराम धरम,बाळासाहेब फकिरा धरम यांनी मृतदेह बाहेर काढले. तसेच तहसीलदार रमा जोशी मॅडम ,तलाठी ,सर्कल भाऊसाहेब यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

मामा शिवराम केदारी यांचे कुटूंब हे मूळ पहाडदरा ( ता.आंबेगाव ) येथील रहिवासी असून त्यांचा भाचा ऋषिकेश काळे हे जुन्नर तालुक्यातील रहिवासी असून ही दोन्ही कुटुंब शेतीकामासाठी लाखणगाव परिसरात वास्तव्यास होते. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.