वहागावच्या शेतकऱ्यांना हरभरा पिकाचे मोफत बियाणे वाटप

Ad 1

राजगुरूनगर- खेड पंचायत समितीच्या कृषी विभागाकडून रब्बी हंगामातील हरभरा पिकाचे वहागाव (ता.खेड) येथील शेतकऱ्यांना ७५० किलो मोफत बीयाणांचे वाटप करण्यात आले.

 

खरीप हंगामात भात पिकाच्या उत्पादनानंतर शेतकरीवर्ग आता रब्बी हंगामाकडे वळत आहे.खेड तालुक्यातील वहागाव येथील शेतकऱ्यांना पंचायत समितीकडून रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी लागणारे बियाणे खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, मा.सभापती अंकुश राक्षे यांच्या उपस्थितीत हरभरा पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले.

या रब्बी पिकाच्या हरभरा बीयाणाची मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना हे बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे.अशी माहीती खेड पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर यांनी सांगितले.

 

तसेच खेड तालुका कृषी कार्यालयाकडून हरभरा पिकाची टोकन व सरी पद्धतीने ठराविक अंतरावर बीयाणाची लागवड करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेण्यासाठी हरभरा पिकाचे बियाणे मोफत वाटप करण्यात आले अशी माहिती कृषी सहायक शेख यांनी सांगितली.

यावेळी पंचायत समितीचे सभापती भगवान पोखरकर, मा.सभापती अंकुश राक्षे, पं.स.सदस्य चांगदेव शिवेकर,कृषी पर्यवेक्षक माणिक वाळे,कृषी सहायक एम.एम शेख, सरपंच सुदाम‌ पवार यांच्या सह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.