कुरकुंभच्या एमआयडीसीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन

Ad 1

दिनेश पवार,दौंड

कुरकुंभ एमआयडीसी मध्ये स्थानिक तरुणांना कायमस्वरूपी नोकरीत घ्यावे,कुरकुंभ एमआयडीसी मधील कारखान्यातील दूषित पाणी व वायु यामुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी प्रहार जनशक्ती दौंड तालुक्याच्या वतीने दौंड तालुका अध्यक्ष रमेश शितोळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ उपविभागीय कार्यालय कुरकुंभ येथे (दि.११) रोजी सकाळी ११ वाजता बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे.

पक्षाचे तालुका अध्यक्ष रमेश शितोळे यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कुरकुंभ एमआयडीसी मध्ये स्थानिक तरुणांना डावलले जात आहे त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे त्याचबरोबर येथील कंपन्या प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी कोणतीही खबरदारी घेत नाही, कित्येक कंपन्यातील सांडपाणी,केमिकल युक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता उघड्यावर सोडले जात आहे त्यामुळे परिसरात दुर्गंधी व दुषित पाणी यात वाढ होत आहे,याबरोबरच वायू प्रदूषण ही मोठ्याप्रमाणात होत आहे हे प्रकार त्वरित थांबवावे यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष बोंबाबोंब आंदोलन करणार आहे