वीरधवल बाबा जगदाळे यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती

दिनेश पवार,दौंड

पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य वीरधवल बाबा जगदाळे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

जगदाळे यांनी आपल्या जिल्हा परिषद गटात प्रत्येक गावात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकास कामे केली आहे तर काही गावामध्ये सुरू आहेत,दौंड शुगरच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणे,स्थानिक तरुणांना कौशल्य आधारित रोजगार उपलब्ध करुन देणे, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे या त्यांच्या कार्यक्षम कर्तृत्वामुळे दौंड च्या पूर्व भागात एक आदर्श नावलौकिक निर्माण झाले आहे, स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड झाल्यामुळे परिसरातुन वीरधवल बाबा जगदाळे यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत.

Previous articleकहू गावच्या आपत्तीग्रस्त कुटुंबियांकडे अखेर शासकीय मदत सुपूर्द
Next articleकुरकुंभच्या एमआयडीसीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन